शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

सत्तेसाठी कॉँग्रेस-भाजपात लढत

By admin | Updated: February 15, 2015 23:40 IST

कडेगाव तालुक्यातील चित्र : दहा सोसायट्या बिनविरोध

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील हनुमान सर्व सेवा सोसायटीच्या चिंचणी, शेळकबाव सोसायटी, कुंभारगाव, सोनकिरे, वडियेरायबाग, शिरगाव या सहा ‘ब’ वर्ग सोसायट्यांच्या सत्तेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये आमने-सामने लढत सुरू आहे, तर विठ्ठलदेव-वांगी, अमरापूर, आसद, शिवणी, देवराष्ट्रे, अंबक या सोसायट्यांमध्येही काँग्रेस-भाजपमध्ये लढत होईल, असे चित्र आहे. कडेगाव पूर्व, शिरसगाव, चिखली, सहोली, विहापूर, कान्हरगड, हिंगणगाव, कडेपूर, सोनसळ, उपाळेमायणी या दहा सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. नेर्ली आणि पाडळी येथे बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अर्ज भरलेले उमेदवार मात्र बिनविरोधची शक्यता फेटाळून लावत आहेत.यापैकी आसद सर्व सेवा सहकारी सोसायटीत मात्र काँग्रेस आणि भाजपचे संयुक्त पॅनेल काँग्रेसच्या अन्य एका पॅनेलशी लढत देत आहे, तर वांगी येथील विठ्ठलदेव सोसायटीतही काँग्रेसला बंडखोरांचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कडेगाव तालुक्यात ग्रामपंचायत असो किंवा सोसायट्यांच्या निवडणुका असो, आ. डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या परस्पर विरोधी गटात सामना रंगतो, हीच परंपरा यावेळी पुढे अविरतपणे सुरू आहे. फरक इतकाच की माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसविराधोत राष्ट्रवादीऐवजी भाजप आले. परंतु लढणारे कार्यकर्ते आणि गट तेच आहेत. आमदार डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या दोघांनी स्थानिक पातळीवर बिनविरोध होणाऱ्या संस्थांच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही. परंतु आता ज्या ठिकाणी निवडणुका लागल्या आहेत, त्या संस्थांच्या राजकारणात थेट नाही, परंतु अप्रत्यक्ष आपआपल्या गटाला दोन्ही नेते ताकद देतील, यामुळे सोसायट्यांच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. त्यामुळे विकास सोसायट्यांचे रण कडेगाव तालुक्यात चांगलेच पेटले आहे. दोन्ही गटाकडून वर्चस्वासाठी जोरदार लढाई सुरू आहे. (वार्ताहर)पॅनेलला सव्वातीन लाख खर्चाची मर्यादानिवडणूक प्राधिकरणाने प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये इतकी खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. यामुळे १३ उमेदवारांच्या पॅनेलला ३ लाख २५ हजार रुपये खर्च करता येतो. इतका प्रचंड खर्च स्थानिक पातळीवरील सोसायट्यांच्या निवडणुकीत होत नाही. यामुळे खर्च मर्यादेची उमेदवारांना चिंता वाटत नाही.