शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 14:34 IST

survey Manoli Kolhapur Sangli :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या  पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

ठळक मुद्देमानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा

विकास शहाशिराळा :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन कि.मी. अंतरावरील मानोली गाव पर्यटन स्थळ पश्चिम महाराष्ट्राचे मानबिंदू ठरावे असे आहे . ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिकोनमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली. सन १८०० मध्ये झालेल्या म्हैसुर विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू - भागाचे अचूक सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली.ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिकोतमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणाऱ्या एका आधाररेषेवरुन ( बेस लाईन ) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे. या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रास जवळील सेंट थामस माऊंट आणि पेरुमबक्कम यातील १२ किमी लांबीची रेषा होती. दुसरी आधाररेषा बैंगलोर येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वारन यांनी निर्धारित केली. १८०६ कोईमतूर , १८०८ तजांवर , १८० ९ तिनवेल्ली , १८२२ हैद्राबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली. दुसरीकडून दक्षिण- पश्चिम बाजूने अँड्यू स्काऊट वा यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले.या सर्वेक्षणास ' द गेट दीयोमेट्रीक सर्वे ऑफ इंडिया ' असे नाव दिले. ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्वेक्षण केले असले तरी, संपूर्ण भारताचे मानचित्र , देशाची समृध्दता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्व्हेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे .१८४२ मध्ये जेव्हा स्कार कोकणातून सर्वेक्षण करत आंबा घाट पार करून आला . तेव्हा, त्रिमितबिंदू निश्चित होईना. उदगिरी , विशाळगड , कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर , स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला. मानोली येथील त्रिमितबिंदूमुळे , कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली. पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली .सन १८४२ साली ख्रिसमस साजरा करुन स्कॉट याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली . या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकवला जातो. मानोली येथील त्रिमितबिंदू हे वारसास्थळ आहे. येथील डोंगराच्या कड्याना मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही भाग खचत चालला आहे, त्यामुळे भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना या वारसास्थळाचे संवर्धन करुन नव्या पिढीला याचे महत्त्व समजावण्याचा संकल्प करणे आवश्यक वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली