शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जतमधील राजकीय समीकरणे बदलणार

By admin | Updated: September 11, 2016 00:26 IST

हरकती मागविल्या : जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण पुनर्रचना, प्रशासनाची तारेवरची कसरत

जत : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहर वगळून तालुक्यातील नऊ जिल्हा परिषदा व अठरा पंचायत समित्यांच्या मतदार संघांची प्रशासनाने पुनर्रचना केली आहे. यावर हरकती मागवून घेऊन त्यानंतर मतदारसंघ निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.२०१२ मध्ये जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे जत जिल्हा परिषद मतदार संघाचे व रामपूर-मल्लाळ पंचायत समिती मतदार संघाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्याऐवजी मुचंडी जि. प. मतदार संघाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. खोजानवाडी आणि गिरगाव हे दोन पंचायत समिती गण नवीन निर्माण झाले आहेत. २०११ ची एकूण लोकसंख्या २ लाख ९२ हजार ९८८ गृहीत धरून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या संख व दरीबडची आणि नियोजित मुचंडी मतदार संघात फार मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. संख मतदार संघातून तिकोंडी पं. स. गण कमी करून त्याचा समावेश दरीबडचीत करण्यात आला आहे. संखमध्ये नवीन गिरगाव पं. स. गण निर्माण केला आहे.पूर्वी मुचंडी पं. स. मतदारसंघ होता. त्याचा समावेश दरीबडचीत होता. आता त्याचे जि. प. मतदार संघात रूपांतर करण्यात आले असून त्यामध्ये खोजानवाडी पं. स. गणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संख, दरीबडची, मुचंडी या तीन जि. प. मतदार संघातून सर्वाधिक हरकती येण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या हरकती घेऊन त्यावर उपाययोजना करून पर्यायी गावे जोडताना प्रशासनाला तारेवरती कसरत करावी लागणार आहे. जाडरबोबलाद, उमदी, बनाळी, शेगाव, डफळापूर व बिळूर या सहा जिल्हा परिषद गटात कमी प्रमाणात बदल झाले आहेत. एक किंवा दोन गावे कमी होऊन इतर गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.येथे संघाचे नाव आहे तसेच ठेवण्यात आले आहे. एका जि. प. गटात सर्वसाधारण ३१ ते ३५ हजार व एका पं. स. गणात १५ ते १७ हजार मतदारसंख्या निश्चित करून पुनर्रचना केली आहे. तालुक्यात दरीबडची हा सर्वात मोठा जि. प. गट असून त्यामध्ये वीस गावे, तर तिकोंडी पं. स. मतदारसंघ सर्वात मोठा असून त्यामध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही मतदार संघ तालुक्याच्या पूर्व भागातील असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत आहेत. (वार्ताहर)जिल्हा परिषद, पंचायत समितींचे संभाव्य मतदारसंघ व गावेजाडरबोबलाद जि. प. गट - जाडरबोबलाद पं. स. गण : उटगी, सोन्याळ, लमाणतांडा (उटगी), उटगी, माडग्याळ गण - लकडेवाडी, कुलाळवाडी, अंकलगी, व्हसपेठ, गुड्डापूर, राजोबावाडी, माडग्याळ. उमदी जि. प. गट- उमदी गण : सोनलगी, सुसलाद, विठ्ठलवाडी, करजगी गण- हळ्ळी, बालगाव, करजगी, बेळोंडगी, निगडी बुद्रुक. संख जि. प.- संख गण : गोंधळेवाडी, संख, आसंगी (जत), खंडनाळ, लमाणतांडा (दरीबडची). गिरगाव गण- बोर्गी बुद्रुक, अक्कळवाडी, गिरगाव, बोर्गी खुर्द, माणिकनाळ, मोरबगी, भिवर्गी, जालिहाळ बुद्रुक. दरीबडची जि. प.गट - दरीबडची गण : तिल्याळ, दरीकोणूर, दरीबडची, पांढरेवाडी, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, आसंगी, तुर्क, गण - लवंगा, तिकोंडी, करेवाडी, कोंत्येवबोबलाद, गुलगुंजनाळ, कोणबगी, मोरेवाडी (कों.बो.), पांडोझरी, मोटेवाडी (अ.नु) कागनरी, पारधेवस्ती. मुचंडी जि. प. गट- मुचंडी गण : वळसंग, शेड्याळ, मुचंडी, रावळगुंडवाडी, कोळगिरी, सोरडी. गण- रामपूर-मल्लाळ, देवनाळ, खोजानवाडी, मेंढेगिरी, उंटवाडी, सालेकिरी-पाच्छापूर, अमृतवाडी, येळदरी. बनाळी जि. प. गट- बनाळी गण : लोहगाव, आवंढी, बनाळी, अंत्राळ, वायफळ, रेवनाळ, अचकनहळ्ळी. येळवी गण- खैराव, कुणीकोणूर, येळवी, शेणेवाडी, सनमडी, घोलेश्वर, निगडी खुर्द, मायथळ, आबाचीवाडी, काराजनगी. शेगाव जि. प. गट - शेगाव गण : नवाळवाडी, वाळेखिंडी, शेगाव, बागलवाडी, सिंगणहळ्ळी, मोकाशेवाडी, काशिलिंगवाडी. कोसारी गण- गुळवंची, प्रतापूर, कोसारी, कुंभारी, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, बागेवाडी. डफळापूर जि. प. गट - डफळापूर गण : खलाटी, मिरवाड, डफळापूर, कुडणूर, जिरग्याळ, शिंगणापूर, शेळकेवाडी. बिळूर जि. प. गट - बिळूर गण : एकुंडी, खिलारवाडी, बिळूूर, साळमळगेवाडी, वज्रवाड. उमराणी गण- बसर्गी, गुगवाड, सिंदूर, उमराणी.