शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पतीची पहिल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी पोलिसांत तक्रार : न्यायालयाने दंड ठोठावल्याचा राग

By admin | Updated: May 10, 2014 23:47 IST

विटा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यास गैरहजर राहिल्याप्रकरणी विटा न्यायालयाने १५० रुपये दंड

विटा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यास गैरहजर राहिल्याप्रकरणी विटा न्यायालयाने १५० रुपये दंड ठोठावल्याचा राग मनात धरून येतगाव (ता. कडेगाव) येथील पती प्रवीण आनंदा पाटील यांनी पहिली पत्नी सौ. राधिका प्रवीण पाटील यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथील कºहाड रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यासमोर रस्त्यावर घडली. याप्रकरणी प्रवीण पाटील यांच्याविरुध्द विटा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. येतगाव येथील राधिका हिचा विवाह त्याच गावातील प्रवीण पाटील यांच्याशी दि. ११ मार्च २०१२ रोजी झाला होता. मात्र एक महिन्यानंतर पती-पत्नीत वाद होऊ लागले. त्यानंतर दि. १५ जुलै २०१३ रोजी प्रवीण यांनी चाफळ येथील राममंदिरात दुसर्‍या मुलीशी विवाह केला. त्यामुळे पहिली पत्नी सौ. राधिका हिने पती प्रवीण यांच्याविरुध्द विटा न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत खटला दाखल केला. मात्र या खटल्यास प्रवीण हजर होत नव्हते. काल शुक्रवारी सुनावणी असल्याने प्रवीण विटा न्यायालयात आले. त्यावेळी न्या. ससाणे यांनी प्रवीण यांना सुनावणीस हजर होत नसल्याने १५० रुपये दंड ठोठावला. त्यानंतर पत्नी राधिका व तिचे वडील येतगावला जाण्यासाठी क्रांतिसिंह पुतळ्याजवळ उभे होते. वडील औषध दुकानात गेल्याचे पाहून प्रवीण हे दुचाकीवरून राधिकाजवळ आले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आज राधिकाने प्रवीण यांच्याविरुध्द विटा पोलिसांत तक्रार दिली असून, सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. एल. शेळके तपास करीत आहेत. (वार्ताहर)