मिरज : जिल्हा काँग्रेसतर्फे मिरजेत रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना भोजनाची पाकिटे देण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना भोजन पाकिटे वाटली. गणेशोत्सवात रात्रंदिवस बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांना उपाशीपोटीच बंदोबस्त करावा लागतो. त्यांच्या या अडचणीची दखल घेऊन संयोगिता पाटील यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे देण्याचा उपक्रम अनेक वर्षापूर्वी सुरू केला होता. त्यांच्या पश्चात सामाजिक बांधिलकीचे हे काम काँग्रेसतर्फे पुढे सुरू ठेवण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अण्णासाहेब खोत, जावेद शेख, आयुब निशाणदार, अरविंद पाटील, अजित दुधाळ, डॉ. विक्रम कोळेकर, अनिकेत गायकवाड, अरुण कांबळे, रणजित पाटील, सुहास कर्नाळे, अमोल जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)
मिरजेत काँग्रेसतर्फे पोलिसांना भोजन
By admin | Updated: September 28, 2015 23:48 IST