लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील मच्छिंद्रनाथ मंदिराच्या पुजाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संंशयितास येथील न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही घटना रविवारी सकाळी घडली होती. यातील दोन संशयित पसार झाले आहेत.
सुनील कानिफनाथ पुजारी (वय २७) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी विजय शंकर साळुंखे याला अटक केली. तर अतुल शंकर साळुंखे आणि अभिजित अशोक कदम हे दोघे पसार झाले आहेत.
या तिघांकडून मच्छिंद्रनाथ गडावर नेहमीच दंगा, मस्ती केली जाते. रविवारी तिघांनी पुजारी यांच्या दुकानात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच उपरण्याने पुजारी यांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.