शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

शिराळ्यातील चार तलावांत विषारी मांगूर मासे, लहान मुले, प्राण्यांनाही खातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:36 IST

Fish Sangli : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. तो समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. दुर्घटना होण्याअगोदरच शासनाने हे मासे नष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देलहान मुले, प्राण्यांनाही खातो, दुर्घटनेचा धोकानष्ट करण्याची मागणी पाडळी जलाशय व मोरणा जलाशयात आढळले

शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. तो समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. दुर्घटना होण्याअगोदरच शासनाने हे मासे नष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज आणले. मात्र, संबंधित व्यापाऱ्याने त्यांना फसवून मांगूर माशांचे बीज दिले. ही लहान पिल्ली असल्याने त्यावेळी लक्षात आले नाही. त्यांनी बीज पाण्यात सोडले. ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत पुढे सरकत करमाळे, पाडळी, शिवणी तलावांसह आता मोरणा धरणामध्ये आली आहेत.हा मासा खाल्यावर कर्करोगासारखे रोग होतात, तसेच जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी आहे. हा मासा मांसाहारी असल्याने इतर माशांना खातो. तो मोठा झाल्यास लहान मुले, कुत्रीसुद्धा भक्ष्य करू शकतो. तो समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, मोरणा धरणातील पाणी कधीही संपत नाही. त्यामुळे येथील हा मासा नष्ट करणे अवघड आहे.महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष महादेव कदम यांनी सांगितले की, येथील काही शेतकऱ्यांची फसवणूक करून हे बीज दिले आहे. हा मासा मांसाहारी आहे. त्यामुळे इतर माशांना तो खातो. तो मोठा झाल्यास या परिसरातील पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुले, कुत्री भक्ष्य करू शकतो. शासनाने हा मासा समूळ नष्ट करावा. 

टॅग्स :Sangliसांगली