शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

क-हाड-पंढरपूर रेल्वेमार्गाची पंतप्रधानांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:05 IST

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी कºहाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती; परंतु अद्याप या रेल्वेमार्गाचे  सर्वेक्षण झालेले नाही. पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देयाशिवाय पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने कोकण, क-हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांतील वारक-यांना पंढरपूरला जाण्यास रेल्वेची सोय होणार आहे.

कडेगाव : गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कºहाड-कडेगाव-पंढरपूर या रेल्वेमार्गासाठी सोनसळ (ता. कडेगाव) येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता विश्राम कदम याने थेट पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर पत्राद्वारे आॅनलाईन पाठपुरावा केला. याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचे सचिव अंबुज शर्मा यांनी याबाबत पुढील कार्यवाहीसाठी उपसचिव जे. जे. वाळवी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

क-हाड-पंढरपूर या १४५ कि.मी.च्या रेल्वेमार्गाची मागणी दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रेल्वेमार्ग झाला तर कडेगावसह दुष्काळी पट्ट्यातील तालुक्याच्या विकासाला चालना तर मिळेलच, शिवाय द्राक्ष, डाळिंब आदी शेतीमाल कोकणसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. याशिवाय पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने कोकण, क-हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांतील वारक-यांना पंढरपूरला जाण्यास रेल्वेची सोय होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे छोटे-मोठे व्यवसाय वाढून नव्या बाजारपेठा विकसित होण्यास मदत होणार आहे. आर्थिक उलाढाल, रोजगार वाढीलाही चालना मिळणार आहे. साहजिकच दुष्काळी पट्ट्यात विकासाला मदत होऊ शकते, असे विश्राम कदम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसे पत्र विश्राम याने रेल्वे मंत्रालयालाही दिले आहे.

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी क-हाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती; परंतु अद्याप या रेल्वेमार्गाचे  सर्वेक्षण झालेले नाही. पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater pollutionजल प्रदूषण