कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब भाळवणे पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब भाळवणे युवा प्रतिष्ठानच्यावतीने हुतात्मा स्मारक प्रांगणात वृक्षारोपण व उपस्थितांना वृक्ष भेट कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कामेरी मंडलचे मंडल अधिकारी मनोहर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. नितीन चिवटे व डॉ. सुनंदा पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष अरविंद कदम, कामेरीचे उपसरपंच केशव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, सचिन चौगुले, पोपट पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आबासाहेब भाळवणे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अभिजित भाळवणे, अध्यक्ष विवेक शेटे, अविनाश देसाई, संजय भाळवणे, निखिल कापसे व सहकाऱ्यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो
ओळी : २९१२२०२०-आयएसएलएम- कामेरी न्यूज
ओळ : कामेरी (ता. वाळवा) येथे पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अभिजित भाळवणे, उदय पाटील, अरविंद कदम उपस्थित होते.