भिलवडी : जमियात उलेमा ए- हिंद व मदनी ट्रस्टतर्फे भिलवडी (ता. पलूस) येथील कब्रस्तानमध्ये १०१ झाडांचे रोपण करण्यात आले.
जमियात उलेमा ए- हिंद, मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांची भिलवडी येथे शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी कोरोनाकाळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील, मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण, ॲड. असिफ अत्तार, नईम पकाली, असिफ जमादार आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाला जमादार, हाफिज रशीद मुजावर, ऐनुद्दीन तापेकरी, मुन्ना पठाण, मकसूद खान, मुस्लीम समाजाचे अध्यक्ष रशीद मुल्ला आदी उपस्थित होते.
फोटो : ०७ भिलवडी १
ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथील कब्रस्तानमध्ये मदनी ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.