शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत पिटबुल श्वानाचा हल्ला, बैलाचे लचके तोडले, भर रस्त्यावर थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:11 IST

हल्ला एवढा गंभीर होता की याच कुत्र्याने एखाद्या नागरिक किंवा लहान मुलांवर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता.

मिरज - पिटबुल या प्रतिबंधित श्वानाने मिरजेत रस्त्यालगत थांबलेल्या बैलावर हल्ला चढवून लचके तोडल्याने बैल गंभीर जखमी झाला. जमावाने श्वानास मार देऊन महापालिकेच्या ताब्यात दिले. यावेळी कुत्र्याच्या मालकाने पलायन केले.

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्यावर शिवशंकर टॉकीज समोर हमाली करणारे कृष्णा बंडगर शनिवारी दुपारी रस्त्याच्या बाजूला बैलाला बैलगाडीला बांधून घरी जेवायला घरी गेले होते. यावेळी रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या पिट बुल या जातीच्या पाळीव कुत्र्याने बैलगाडीला बांधलेल्या बैलावर हल्ला करून बैलाला गंभीर जखमी केले. नागरिकांनी कुत्र्याला चोप देऊन बैलाची कशीबशी सुटका केली. पिट बुल पाळीव कुत्रे मालकासोबत दुचाकीवरून जात असताना बैलगाडीजवळ कुत्रे आल्यानंतर कुत्र्याने बैलाला पाहून अचानक दुचाकीवरून उडी मारत बांधलेल्या बैलावर हल्ला केला.

बैलाच्या तोंडाचे लचके तोडत, जिभ व पायाचा चावा घेतला. यावेळी नागरिकांनी कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र बेकाबू कुत्र्याने कोणालाही न जुमानता बैलाला गंभीर जखमी केले. हा प्रकार सुरू असताना कुत्र्याचा मालक दुचाकी वरून पळून गेला. जमावाने काठ्याने कुत्राला मारहाण करीत बैलाला सोडविले. ॲनिमल्स प्रोटेक्शन ॲन्ड शेल्टर अँनिमलचे अशोक लकडे यांनी महापालिका डॉग व्हॅनच्या मदतीने या कुत्र्याला जेरबंद केले. जखमी बैलावर उपचार करण्यात आले. जमावाच्या मारहाणीमुळे कुत्राही जखमी झाला आहे.

या प्रकारामुळे तेथे मोठी गर्दी जमली होती. हल्ला एवढा गंभीर होता की याच कुत्र्याने एखाद्या नागरिक किंवा लहान मुलांवर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. श्वानाच्या या हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठा उपद्रव असताना आता या बेकायदा पाळीव कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पिटबुल पाळण्यास बंदी...

पिट बुल या जातींचे हिंस्त्र व आक्रमक श्वान पाळण्यास बंदी आहे. बंदीचे उल्लंघन करून रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने श्वान नेणाऱ्या व बैल गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झालेल्या श्वान मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे ॲनिमल प्रोटेक्शन व शेल्टर या संस्थेचे अध्यक्ष अशोक लकडे यांनी सांगितले. रस्त्यावरील सिसिटीव्ही तपासुन पोलिसांनी श्वानमालकास शोधून काढण्याची मागणी अशोक लकडे यांनी केली.

टॅग्स :dogकुत्रा