शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भेसळीच्या संशयावरून पेट्रोल पंप सील

By admin | Updated: April 14, 2015 00:54 IST

मालगावातील घटना : पंप चालक व ग्रामस्थांत वादावादी

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे पेट्रोल व डिझेल भेसळीच्या ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन मिरज-मालगाव रस्त्यालगत असणारा जीजा पेट्रोलिंक हा हिंदुस्थान पेट्रोल कंपनीचा पंप रविवारी सील करण्यात आला. तालुका पुरवठा अधिकारी व पेट्रोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेलचा दर्जा तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. ग्राहकांशी उध्दट वर्तन करणाऱ्या पंप चालकांकडून हा पंप कंपनीने ताब्यात घ्यावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. भेसळीवरून पंप चालक व ग्रामस्थांत जोरदार वादावादीही झाली. मालगावजवळ हिंदुस्थान कंपनीचा जीजा पेट्रोलिंक हा पेट्रोल पंप आहे. बरेच दिवस बंद असलेला हा पंप कंपनीने म्हैसाळ येथील एकास चालविण्यासाठी दिला आहे. मात्र तो सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरला आहे. पेट्रोल व डिझेलच्या दर्जामध्ये सुधारणा न झाल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. एका ग्रामस्थाच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पंप चालकाने उध्दट वर्तन केल्याने पंप चालक व ग्रामस्थांत जोरदार वादावादी झाली. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सावंत, राजू भानुसे यांनी भेसळीचा संशय व्यक्त करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कंपनीचे अधिकारी प्रदीप हेडाव यांनी या तक्रारीची दखल घेऊन हा पंप सील केला. हेडाव दुसऱ्या दिवशी सील काढण्यास व पेट्रोल, डिझेलचे नमुने घेण्यासाठी आले होते. माजी सरपंच सावंत, संजय काटे व राजू भानुसे यांनी, संशयित पेट्रोल व डिझेलची प्रशासनातर्फे तपासणी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. अजित भंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर तालुका पुरवठा अधिकारी येळापुरे उपस्थित राहिले. हेडाव व पुरवठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंपाचे सील काढले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दर्जा तपासणीसाठी पेट्रोल व डिझेलचे नमुने घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वास खांडेकर, विलास होनमोरे, तलाठी एस. डी. हंगे, मामा कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)