शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीपेक्षा कर्नाटकात पेट्रोल, डिझेल स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 18:52 IST

Petrol Pump Rate Sangli-karnataka : सांगलीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कर्नाटकपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक इंधनासाठी कर्नाटकमधील पंपांवर धाव घेत आहेत. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्रीय पंपांना बसत आहे.

ठळक मुद्देसांगलीपेक्षा कर्नाटकात पेट्रोल, डिझेल स्वस्तजत, मिरज तालुक्यातील पंपांचे नुकसान

संतोष भिसेसांगली : सांगलीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कर्नाटकपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक इंधनासाठी कर्नाटकमधील पंपांवर धाव घेत आहेत. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्रीय पंपांना बसत आहे.इंधनावरील राज्यांच्या कर आकारणीमधील फरकामुळे कर्नाटकात इंधन काही प्रमाणात स्वस्त आहे. पेट्रोल प्रतिलिटर अडीच रुपयांनी तर डिझेल ७० पैशांनी स्वस्त आहे. सांगलीत गुरुवारचे पेट्रोलचे दर १०२.६२ पैसे होेते. शहरापासून दूरच्या गावांत तसेच जत, आटपाडी भागात १०३ रुपये होते. डिझेल सांगलीत ९३.२३ रुपये तर सीमाभागातील गावांत ९४ रुपये प्रतिलिटरने विकले जात होते.

कर्नाटकात पेट्रोलमध्ये अडीच ते तीन रुपयांची बचत होत असल्याने तसेच डिझेल सुमारे रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने वाहनचालकांचा ओढा कर्नाटकातील पंपांकडेच आहे. जत, मिरज या सीमाभागाशी संलग्न तालुक्यांमध्ये पंपांवरील विक्रीला याचा फटका बसतो.वाहनचालक काही किलोमीटर अंतरावरील कर्नाटकात जाऊन तेल भरुन घेतात. कामानिमित्त कर्नाटकात गेल्यावर येतानाच टाकी फुल्ल करुन घेतात. मोठा वाहनांची यामध्ये मोठी बचत होते. डिझेलची खरेदी एकावेळी ५०, १०० लिटरने होते, त्यामुळे थेट तितकेच पैसे वाचतात. भाड्याच्या निमित्ताने  कर्नाटकात जाणारी वाहनेदेखील तिकडेच डिझेल भरुन पुढे मार्गस्थ होतात.जत, मिरज तालुक्यातील पंपांचे नुकसानसीमाभागातील म्हैसाळ, आरग, बेडग, सलगरे यासह संख, उमदी आदी गावांतील पंपांचा व्यवसाय यामुळे थंडावते. काही वर्षांपूर्वी कर्नाटकपेक्षा स्वस्त पेट्रोलचे फलक महाराष्ट्रातील पंपांवर झळकले होते, आता परिस्थिती नेमकी उलट आहे.सांगलीत प्रतिलिटर दर

  • पेट्रोल १०२.६२ पैसे
  • डिझेल ९३.२३

अथणी येथे प्रतिलिटर दर

  • पेट्रोल १००.१०
  • डिझेल ९२.५७

 

सीमाभागातील पंपचालकांना याचा मोठा फटका बसतो. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील डिझेलच्या किंमतीत फार फरक नाही, पण पेट्रोल कर्नाटकात दोन ते अडीच रुपयांनी स्वस्त आहे. कर्नाटकशी संलग्न गावातील वाहनचालकांचा कल कर्नाटककडे आहे.- सत्यजीत पाटील,पंप चालक, सांगली

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपSangliसांगलीKarnatakकर्नाटक