शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

‘अमृत’च्या निविदेविरोधातील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अमृत योजनेंतर्गत मिरज पाणीपुरवठा योजनेच्या निविदेबाबत स्थायी समितीने केलेल्या ठरावाला स्थगिती द्यावी, यासाठी महापौर गटाने दाखल केलेली याचिका गुरुवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निकालामुळे महापौर गटाला धक्का बसला असून अपील करण्यासाठी १९ पर्यंतची मुदत न्यायालयाने दिली आहे.अमृत योजनेतून मिरज शहरासाठी १०३ कोटी रुपयांची पाणी योजना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अमृत योजनेंतर्गत मिरज पाणीपुरवठा योजनेच्या निविदेबाबत स्थायी समितीने केलेल्या ठरावाला स्थगिती द्यावी, यासाठी महापौर गटाने दाखल केलेली याचिका गुरुवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निकालामुळे महापौर गटाला धक्का बसला असून अपील करण्यासाठी १९ पर्यंतची मुदत न्यायालयाने दिली आहे.अमृत योजनेतून मिरज शहरासाठी १०३ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. यापैकी ८७ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रशासनाने काढली होती. या निविदेवरून गेल्या महिन्याभरापासून महापालिकेत वाद सुरू आहे. जादा दराच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर महापौर गटाने त्याला विरोध केला. महापौर गटाच्यावतीने बुधवारी बाळासाहेब गोंधळी, पुष्पलता पाटील, प्रदीप पाटील, जरीना बागवान या सर्वपक्षीय नगरसेवकांसह आनंदा देवमाने, हेमंत खंडागळे व राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावतीने दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश बी. एस. गारे यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. तसेच आयुक्त, स्थायी समिती सभापती, ठेकेदार, जीवन प्राधिकरणला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.गेल्या सोमवारी या याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला होता. महापौर गटाच्यावतीने अ‍ॅड. सुहास सेठ यांनी, तर सभापतींच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर यांनी बाजू मांडली होती. आयुक्तांच्यावतीने अ‍ॅड. सुशील मेहता उपस्थित होते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर गुरुवारी न्यायाधीश गारे यांनी याचिका नामंजूर केली.याबाबत अ‍ॅड. नरवाडकर म्हणाले की, पाणी योजनेसाठी राज्य शासनाने निधी दिला आहे. तसेच ठेकेदारांशी वाटाघाटी करून निविदा दरही शासनस्तरावरच कमी करण्यात आला आहे. निविदेला मंजुरी, वर्कआॅर्डर देण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत. महासभेने कोणतेही विषयपत्र नसताना फेरनिविदेचा ठराव केला होता. या बाबी आम्ही न्यायालयाला पटवून देण्यात यशस्वी ठरलो. जादा दराच्या निविदेचा मुद्दाही न्यायालयाने फेटाळत, शासनाकडून निधी येणार असून स्थायी समितीचा ठरावही महासभेशी सुसंगतच असल्याचे म्हटले आहे. या निकालामुळे मिरजेच्या पाणी योजनेचा मार्ग खुला होईल, असेही नरवाडकर यांनी सांगितले.विशेष वकील नियुक्तमहापालिकेच्या पॅनेलवर वकिलांची मोठी फौज आहे. अमृत योजनेबाबत दाखल याचिकेत आयुक्तांची बाजू मांडण्याची जबाबदारी महापालिकेच्या वकिलांवर सोपविण्यात आली होती. पण गत सुनावणीनंतर आयुक्तांनी पॅनेलवर नसलेले अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर यांची विशेष आॅर्डर काढून, न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली होती.अपील करणार : महापौरजिल्हा न्यायालयाने पाणी योजनेच्या निविदेबाबत दाखल याचिका नामंजूर केल्याचे समजले. पण अद्याप सविस्तर निकालपत्र हाती आलेले नाही. न्यायालयाने १९ पर्यंत निविदा प्रक्रियेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत अपील करण्यासाठी मुदत दिली आहे. निकालपत्र येताच अभ्यास करून न्यायालयात अपील करणार असल्याचे महापौर हारूण शिकलगार यांनी सांगितले.मिरज शहरासाठी पाणी पुरवठा योजना महत्त्वाची आहे. महापालिकेवर वाढीव बोजा पडणार नाही, असा ठरावच केला असताना, महापौर व इतर नगरसेवकांनी राजकीय हेतूने याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी दिली.