शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब पीक विम्यास तलाठी दाखल्याने खोडा- आॅनलाईन अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही

ठळक मुद्दे : न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देण्यास निर्बंध-शासनानेच तोडगा काढण्याची गरज

गजानन पाटील ।संख : प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी आल्या आहेत. डाळिंब नोंदीचे उतारे मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदी करून उतारे आणावे लागत आहेत. आॅनलाईन नोंद वेळखाऊ आहे. तलाठी दाखल्याच्या अटीमुळे डाळिंब विमा भरण्यास खोडा बसला आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. ही बाब विचारात घेऊन फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविली जात आहे. डाळिंब फळबागेसाठी १४ जुलै ही सहभागी होण्यास मुदत होती.

सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, जालना, बुलडाणा, बीड, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील डाळिंब फळबागांसाठी टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडून विमा दिला जाणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंब क्षेत्र १२ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. उजाड अशा माळरानावर बागा फुलवल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांसह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसºया बाजूला तलाठ्यांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकºयांचा विमा बॅँका भरून घेत नाहीत. उताºयावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बॅँका तलाठ्याचाच दाखला मागत आहेत. कृषी सहायक किंवा कृषी अधिकाºयाचे दाखले स्वीकारले जात नाहीत. अलीकडे नवीन लागण केलेल्या डाळिंबाची उताºयावर नोंद नाही. त्यामुळे अशा शेतकºयांवर डाळिंब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विम्यासाठी विमा फॉर्म, ७/१२ उतारा, खाते उतारा, लागवडीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र झेरॉक्स, बॅँक पासबुक, तलाठ्याचा दाखला, स्वयंघोषित पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.बँकांकडूनही असहकार्य : शेतकरी नाराजजळीत पीक विमा भरण्यासाठी बँकेकडूनही शेतकºयांना सहकार्य मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये शेतकरी हेलपाटे मारत आहेत. दरीबडची येथे अजूनही विमा भरण्यास सुरुवात झालेली नव्हती.

डाळिंब फळपीक दृष्टिक्षेप...लागवडीचे क्षेत्र- १२ हजार ३४४.५९ हेक्टरहेक्टरी विमा रक्कम - ६०५० रुपयेएकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) - १ लाख २१ हजार

 

डाळिंब लागवडीच्या दाखल्याची अट शिथिल करून शेतकºयांना विमा भरण्यास मुभा द्यावी, तरच शेतकºयांना लाभ मिळेल. शासनाने यामध्ये लक्ष घालून दाखल्याची अट शिथिल न केल्यास जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी भागातील शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- विक्रम ढोणे