शिराळा
: जिल्ह्याच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक परवान्याबाबत सांगलीच्या शासकीय यंत्रणेकडून वेळेत कार्यवाही करण्यात येत नाही. जिल्ह्यात या परवान्यासाठी कित्येक तास उलटले तरीही तुमच्या अर्जाबाबत तपासणी सुरू असल्याचाच संदेश मिळत आहे.
सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णालयात तपासणी असो की अन्य महत्त्वाच्या कामासाठी शासकीय परवानगी गरजेची आहे. मात्र वेळेत परवानगी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. चेक पोस्टवर थांबून विनवण्या करून परवानगी मिळाली तर ठीक नाहीतर रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
या उलट कोल्हापूर जिल्ह्यात मात्र काही क्षणात मग रविवार हा सुट्टीचा दिवस असो नाहीतर इतर कामाचा दिवस असो तुम्हाला परवानगीबाबत हो किंवा नाहीचा संदेश मिळतो. तसेच हो असेल तर पास ही मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील जी परवानगीबाबत कार्यवाही करण्याची पद्धत आहे ती सांगली जिल्ह्यात का मिळू शकत नाही. नागरिकांच्यातून कोल्हापूर जिल्ह्यासारखी पद्धत सांगली जिल्ह्यात करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.