शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:10 IST

राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने व्यापारी पेठा चालूच राहणार

सांगली : राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.माने यांनी कापड पेठ, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड येथील व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर पेठा सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. याबाबत माने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्र व जिल्ह्यात आनावश्यक कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.

त्यामुळे व्यापार व जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले आहे, महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील जनता, व्यापाºयांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन आम्ही केले आहे.या संदर्भात सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड, सिंधी मार्केट, गणेश मार्केट व उपनगरांतील व्यवसायिकांशी या पार्श्वभूमी संवाद साधण्यात आला व्यापाऱ्यांच्यावतीने आम्ही कर्फ्यूस पूर्ण विरोध दर्शवित आहोत.

महापूर, कोरोना संकट व त्यामुळे लादले गेलेले लॉकडाऊन यामुळे कजार्चे हप्ते, कामगारांचा पगार, महापालिका व शासन टॅक्स विना व्यावसाय भरावा लागत आहे. त्यात पुन्हा दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. ऊलट जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रथम जिल्हा प्रशासनाने व महापलिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जनतेची आरोग्य व आर्थिक सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली हे जाहीर करावे व मगच जनता कर्फ्यूचे आवाहन करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली