शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तासगावात विकासाचा पिंंगा अन् जनतेला ठेंगा

By admin | Updated: July 19, 2016 23:55 IST

साडेचार वर्षांचा कारभार : नेत्यांची आश्वासनांची वाऱ्यावरची वरात, बहुतांश नगरसेवकांची पुन्हा मोर्चेबांधणी

दत्ता पाटील-- तासगाव : तासगावात नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षणातून काही विद्यमान कारभाऱ्यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अपवाद वगळता बहुतांश विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी मोर्र्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र पालिकेचा साडेचार वर्षांचा कारभार, मिळून सारेजण अशाच पध्दतीने झाला. निवडणुकीच्या काळात नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची वाऱ्यावरची वरात निघाली. सर्वच गटाच्या आणि पक्षाच्या कारभाऱ्यांनी सत्ता भोगली, मात्र हा कारभार पाहिल्यानंतर शहरात ‘विकासाचा पिंंगा आणि जनतेला ठेंगा’ असेच चित्र असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून त्याचा जाब विचारला जाईल, हे नक्की.तासगाव नगरपालिकेची साडेचार वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी या दोन्ही दिग्गज नेत्यांना आव्हान निर्माण केले होते. त्यावेळी आबा-काका गटाचे एकहाती वर्चस्व राहिले, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुरुवातीची अडीच-तीन वर्षे दोन्ही नेत्यांच्या कारभाऱ्यांनी एकत्रित पालिकेचा गाडा चालवला. त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडीत काका गटाशी काडीमोड झाल्यानंतर काँग्रेसचा नगराध्यक्ष करुन काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता ताब्यात घेतली, तर सहा महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपमय करून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. कमी-जास्त प्रमाणात सर्वच पक्षाच्या आणि गटाच्या कारभाऱ्यांनी पालिकेची सत्ता भोगली. सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हितापेक्षा स्वहित जोपासण्यातच बहुतांश सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले.निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न झाले नाहीत. नेत्यांकडून काही प्रमाणात आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला गेला. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला; मात्र या निधीवर ठेकेदारी आणि टक्केवारीच्या माध्यमातून डल्ला मारण्याचेच काम अनेकांनी केले. तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्रित आल्याने तासगावकरांनी मोठ्या विश्वासाने नेत्यांवर विश्वास ठेवून सत्ता ताब्यात दिली, मात्र पालिकेतील कारभाऱ्यांचा कारभार ठेकेदारी आणि टक्केवारीच्या पलीकडे गेला नाही. त्याहीपेक्षा सत्तेत राहून गटबाजी आणि सुंदोपसुंदीचा कलंकही कायम राहिला. शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरणारी कामे झाली, मात्र ही कामेही पूर्ण करता आली नाहीत. त्याउलट अपूर्ण कामांचे श्रेय घेण्यासाठीच अनेकांनी पुढाकार घेतला. साडेचार वर्षांच्या कारभारात जनतेचा विकासकामांच्या बाबतीत भ्रमनिरास झाला आहे. एकंदरीत आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागातील आरक्षण जैसे थे राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नशीब अजमावण्यासाठी नगरसेवकांकडून तयारी सुरु झाली आहे. यानिमित्ताने मतदारांकडूनही कारभाराचा लेखाजोखा मांडला जात आहे. त्यातून आश्वासनांच्याबाबतीत केवळ भ्रमनिरासाचे चित्र दिसून येत आहे.नगरसेवक अन् ठेकेदारी चर्चेत नगरपालिकेच्या सत्तेचे चक्र सातत्याने फिरत राहिले. त्यातच नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि नेत्यांच्या हतबलतेमुळे नगराध्यक्ष पदाचीही संगीत खुर्ची झाली. त्यातच शासनाकडून, विशेषत: यापूर्वी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि आता भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. मात्र हा निधी खर्च करताना जनतेची गरज पाहण्याऐवजी नगरसेवकांचे हित पाहिले गेले. नगरसेवकांची ठेकेदारी आणि टक्केवारीही सातत्याने चर्चेत राहिली. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा होऊनही शहरातील समस्या जैसे थे आहेत.आश्वासनांवर एक नजर शहरात मध्यवर्ती बसस्थानकालगत भले मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडले. मात्र ठेकेदारांकडून वेळेत काम झाले नाही. किंंबहुना या कामाच्या ठेकेदारांची आणि पडद्यामागील नगरसेवक ठेकेदारांचीही चर्चा होत राहिली. आजअखेर हे काम पूर्ण झाले नाही. मात्र नामांतरणाचा विषय मात्र चर्चेत आला.तासगाव शहरातील जनतेला मुबलक पाणी देण्यासाठी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेसाठीदेखील कोट्यवधी रुपये मिळाले. याही योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. किंंबहुना योजनेचे निकृष्ट काम चव्हाट्यावर आले. काही दिवसांपूर्वी एका प्रभागात चोवीस तास पाण्याची सोय झाली. मात्र अन्य प्रभाग वंचितच राहिले.शहरांतर्गत रस्ते, गटारी, बोळ गरज नसताना दुसऱ्यांदा काम करुन निधी खर्च केला गेला. मात्र विस्तारित गुंठेवारी भागाच्या समस्यांचे गाऱ्हाणे कायम आहे.झोपडपट्टीमुक्त तासगाव शहरासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विशेष योजनेतून झोपडपट्टीधारकांच्या घरकुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. या घरकुलांच्या कामांचा दर्जा तर अत्यंत निकृष्ट आहेच, किंंबहुना आजअखेर या घरकुलांचे कायदेशीरपणे झोपडपट्टीधारकांना वाटपही झालेले नाही.छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी केवळ भूमिपूजन झाले आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उभारणी जागेच्या वादात रखडली आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढत आहे. रिंग रोडचा प्रश्नही जैसे थे आहे.