शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:29 IST

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते हरवलेशेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही

अशोक पाटील इस्लामपूर : तत्कालीन भाजप, शिवसेना युतीच्या राज्यात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, परंतु याचा कसलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत.इस्लामपूर शहरातील यल्लम्मा चौक येथे झालेल्या भाजपच्या सभेत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामील व्हावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला होता.

त्यानंतर भाजपच्याच ताकदीवर त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यात आले. विशेष म्हणजे कृषी राज्यमंत्रीपद मिळाल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार, असेच वाटत होते. परंतु तसे काहीच घडले नाही. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला यश मिळाले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ताही आली. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. येथेही भाजप-शिवसेनेची सत्ता येता येता तो मान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळाला. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालेले सदाभाऊ खोत आता विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनच राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका-टिप्पणी करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही राहिले नाही.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नाराज झालेले राजू शेट्टी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे ऊस परिषद घेतली. यावेळच्या परिषदेला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्याची साखरसम्राटांसह ऊस उत्पादकांत चर्चाही झाली नाही.

याचे एकमेव कारण म्हणजे राजू शेट्टी हे साखरसम्राटांच्या बरोबरीने बसलेले शेतकऱ्यांना रुचलेले नाही. हेच मोठे कारण त्यांच्या पराभवासही कारणीभूत ठरले आहे. आता तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणाला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याकडे केली आहे.एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेट्टी आणि खोत यांची जोडी आता सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात गुंतली आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या गोळाबेरजेत हे नेते शेतकऱ्यांपासून दुरावलेत, हे नक्की.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली