शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्यात येणार : इस्लामपुरात ‘पीआरसी’चा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:46 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ग्रामसेवकांची वादग्रस्त कार्यपध्दती आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देयोजनांच्या कामावरून नाराजीबैठकीनंतर सभापतींच्या दालनात समिती सदस्यांना मागण्यांचे निवेदन

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ग्रामसेवकांची वादग्रस्त कार्यपध्दती आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीने याबाबत अधिकाºयांना धारेवर धरत कारवाईची विचारणा केली. ग्रामसेवकांच्या गैरवर्तनावरुन अधिकाºयांना धारेवर धरताना, ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची शिफारसही केल्याचे समजते.

येथील पंचायत समितीला आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने भेट दिली. सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य देवराज पाटील, जि. प. सदस्य संजीवकुमार पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले.

त्यानंतर सभागृहात आमदार पारवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक पदाधिकाºयांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गोपनीय बैठकीच्या नावाखाली बसता येणार नसल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले. फक्त समितीचे सदस्य आणि शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, पंचायत समिती व बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमर राजूलकर, आमदार राहुल बोंद्रे, डॉ. देवराज भोई, विधानसभेचे उपसचिव विलास आठवले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होते.बैठकीनंतर सभापतींच्या दालनात समिती सदस्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सभापती हुलवान, उपसभापती नेताजी पाटील यांनी विविध मागण्या केल्या.रखडलेल्या योजना : समिती नाखूशबैठकीत तालुक्यातील ग्रामसेवकांच्या कार्यपध्दतीवरुन समिती सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. ग्रामसेवकांवर कोणाचे नियंत्रण असते, अशी विचारणा करत, समितीने ग्रामविस्तार अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची शिफारस केल्याची चर्चा होती. तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबतही समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.