शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

भिलवडी : शासनाने सामूहिक बँक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशा मागणीचे ...

भिलवडी : शासनाने सामूहिक बँक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्याचे पीक कर्ज थकीत नसेल, तर २०१९ च्या पुराची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले. २०१९ च्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या सामूहिक खाती असणाऱ्या म्हणजे ज्यांची खातेफोड नसल्याने सर्व्हे व गट नंबर एकच असलेल्या शेतकऱ्यांना या शासनाने कर्जमाफीचा लाभ दिला आहे. पण सदर रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता परस्पर पीक कर्जाला जमा करून घेण्याचे प्रकार उघडकीस आले होते. ही रक्कम शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी दिली आहे. ती तात्काळ वर्ग होत नाही तोपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

बँकेच्या व्यवस्थापकांनी नुकसान भरपाई व कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिल्याने स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.

यावेळी प्रमोद गौंडाजे, प्रवीण माळी, रणजित पाटील, वैभव गौंडाजे आदींसह शेतकरी उपास्थित होते.

फोटो-10bhilwadi0110

फोटो ओळ:

स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांना निवेदन दिले.