शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पतंगराव, जयंतरावांनी आपापलं सांभाळावं : चंद्रकांत पाटील--सांगली महापालिका भाजप जिंकणारच- विधानसभा निवडणुकीत सर्व जागा आमच्याचर्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:20 IST

सांगली : भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्याने, सांगली महापालिका निवडणूक किस झाड की पत्ती! जिल्ह्याचे आजवर नेतृत्व करणारे पतंगराव कदम, जयंत पाटील, ज्यांना आपापल्या विधानसभा

सांगली : भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्याने, सांगली महापालिका निवडणूक किस झाड की पत्ती! जिल्ह्याचे आजवर नेतृत्व करणारे पतंगराव कदम, जयंत पाटील, ज्यांना आपापल्या विधानसभा मतदार संघातील नगरपालिका, पंचायत समित्या वाचवता आल्या नाहीत, त्यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घालू नये. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकही जागा सोडणार नसून, सांगली महापालिका भाजपच जिंकणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात पाटील बोलत होते. पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील यांच्या ताब्यात असलेली तासगाव नगरपालिका संजयकाकांनी ताब्यात घेतली. इस्लामपुरातील नगरपालिका जयंत पाटलांकडून ताब्यात घेतली. तसेच कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याकडून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यामुळे पतंगराव व जयंतराव यांनी महापालिकेत लक्ष घालू नये. त्यांनी आपापली विधानसभेची जागा सांभाळण्यासाठी प्रयत्न करावेत.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या चालू असलेल्या कामकाजामुळे जनतेत भाजपबद्दल विश्वास वाढतो आहे. ७० वर्षे कॉँग्रेसला न करता आलेली कामे भाजप करत आहे. संपूर्ण देश भाजपमय होत असल्याने, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाला कोणतीही अडचण नाही.यावेळी पाटील व देशमुख यांच्याहस्ते चांदीची तलवार देऊन दिनकरतात्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.२४ तास पाणी, ‘स्मार्ट सिटी’साठी बांधीलमहापालिका क्षेत्रात शुध्द पाण्याबरोबरच उघड्या गटारींसह इतरही समस्या आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात चोवीस तास स्वच्छ व शुध्द पाणी, बंदिस्त गटारी देण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले.आता दर आठवड्याला सांगलीतमाझ्या कामाची पध्दत वेगळी असून, सभा घेण्याऐवजी घरा-घरात जाऊन भेटींवर माझा भर असतो. त्यामुळे पुढील आठवड्यापासून दर आठवड्याला सांगलीत येणार असून, पालकमंत्री देशमुख यांनीही आपले बिºहाड हलवावे. एक खासदार, दोन आमदार असताना, सत्ता यायला कोणतीही अडचण नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणElectionनिवडणूक