शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुतारी पथकांचा कर्नाटकात डंका , पश्चिम महाराष्टचा सहभाग : श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:05 IST

शिरटे : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महावीरांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सांगली व कºहाड परिसरातील १०८ बहाद्दर तुतारी वादकांनी तुतारीने अवघा परिसर चैतन्यदायी करून सोडला.

निवास पवार।शिरटे : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महावीरांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सांगली व कºहाड परिसरातील १०८ बहाद्दर तुतारी वादकांनी तुतारीने अवघा परिसर चैतन्यदायी करून सोडला. त्यांच्या तुतारीने महामस्तकाभिषेक सोहळ्यात पंचप्राण फुंकल्याची भावना येथे सहभागी झालेल्या भाविकांनी व्यक्त केली. भव्य-दिव्य शोभायात्रेमध्येही महाराष्ट्राच्या तुतारीने कर्नाटकातील विंध्यगिरीचा परिसर दुमदुमून टाकला होता.श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमान सागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाहुबली महावीरांचा महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात सुरूआहे. या उत्सव समितीच्या सदस्या गीतांजली उपाध्ये (सांगली) यांच्या सहकार्याने शिवकालीन तुतारी लोककला मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गुरव (वाटेगाव) यांच्या अध्यक्षतेखाली रत्नदीप गुरव (उंडाळे), महेश गुरव (करमाळे), कृष्णत गुरव (कार्वे), माणिक गुरव (शिरटे) व सचिन गुरव (तळबीड, ता. कºहाड) यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील १०८ तुतारी वादकांनी कला सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्यात विंध्यगिरी पर्वताच्या परिसरात १६ फेबु्रवारी रोजी सुमारे सहा किलोमीटरपर्यंत लांबीची शोभायात्रा निघाली होती. त्यामध्ये तीर्थंकारांची पालखी, ६ शास्त्र ग्रंथ, सोन्या व चांदीचा लेप दिलेले ८ चित्ररथ, मंगल कलश घेऊन श्राविका, पंचरंगी ध्वज घेऊन श्रावक, श्राविका, २०० बँड व त्यामध्ये असणाºया महाराष्ट्रातील या १०८ तुतारीवादकांनी कलेचे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

दहा दिवसांच्या कालावधीसाठी या सर्व तुतारीवादकांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु या सर्व कलाकारांचे काम पाहून येथील आयोजकांनी आणखी ८ दिवस थांबण्याची विनंती केली. या त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून श्रवणबेळगोळ मठाचे प्रमुख कर्मयोगी जगद्गुरू भट्टारक महास्वामी आणि आचार्य पुष्पदंत महाराज यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व बाहुबली भगवान यांचे शिल्ड भेट देण्यात आले.बारा वर्षांतून एकदा साजºया होणाºया महामस्तकाभिषेक सोहळ्यात तुतारी वादनाची संधी मिळाली, हे आमचे भाग्यच आहे. तसेच गुरव समाजाचा हा सन्मान आहे. बाहेरील राज्यांप्रमाणे आपल्या भागातही तुतारीला सन्मान मिळणे गरजेचे आहे. अन्यथा ही कला लोप पावण्यास वेळ लागणार नाही.- माणिक गुरव, शिरटे (तुतारीवादक)