शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पांचुब्रीतील बिबट्याची बछडी अखेर आईच्या कुशीत, तीन दिवसांची धडपड यशस्वी

By संतोष भिसे | Updated: March 7, 2024 18:57 IST

शिराळा : पाचुंब्री ( ता. शिराळा ) येथील बांबवडे फाट्यानजीक काळी वाट परिसरात प्रकाश शंकर माने यांच्या ऊसाच्या फडात ...

शिराळा : पाचुंब्री ( ता. शिराळा ) येथील बांबवडे फाट्यानजीक काळी वाट परिसरात प्रकाश शंकर माने यांच्या ऊसाच्या फडात बिबट्याची दोन बछडी आढळली होती. वन विभागाच्या प्रयत्नांनंतर आईने त्यांना काल, बुधवारी उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.पिलांना आईने न्यावे यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते. पिलांना आहे, त्याच ठिकाणी ठेऊन त्यावर लक्ष ठेवले होते. मंगळ‌वारी तिने पिलांना नेले, पण काही वेळानंतर पुन्हा तेथेच आणून ठेवले. मात्र बुधवारी पिलांना घेऊन मादी निघून गेली. सोमवारी (दि. ४) माने यांच्या शेतात ऊसतोडणीवेळी ही पिले दिसली होती. उप वनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, वन रक्षक रजनीकांत दरेकर, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक स्वाती कोकरे, हनुमंत पाटील, संतोष कदम, दादा शेटके, अक्षय ढोपळे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चार ते पाच दिवसांची मादी बछडी दिसून आली. वन विभागाच्या पथकाने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. रात्रीच्या देखरेखीसाठी चार नाईट व्हिजन कॅमेरे लावले.सोमवारी व मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मादी बछड्यांजवळ आल्याचे कॅमेऱ्यांत दिसले. ती २० मिनिटे तेथे थांबली होती. त्यानंतर दोन्ही बछड्यांना उचलून याच ऊसशेतीत काही अंतरावर नेऊन ठेवले. हा प्रयत्न दोनवेळा झाला.माने यांनी वन खात्याच्या सूचनेनुसार चार गुंठे ऊस न तोडता तसाच ठेवला. तेथे बछड्यांना ठेवले. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान पिलांची आई त्यांच्याजवळ आली. सुमारे दोन तास बछड्यांजवळ थांबली. रात्री साडेदहाच्या दरम्यान बछड्यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेली. वन विभागाच्या तीन दिवसांच्या खटपटीला यश आले.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग