पुदाले म्हणाले, बँकेचा एकूण व्यवसाय ६८७ कोटींपेक्षा अधिक आहे. ठेवी ४०३ कोटींपेक्षा जास्त, तर कर्जे २८४ कोटींपेक्षा जास्त आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या शिल्लक नफ्यातून कोणत्याही नागरी सहकारी बँकेस लाभांश देता आला नाही. यावर्षीच्या नफ्यातून १४ टक्के लाभांश खात्यावर जमा केला आहे. बँकेच्या प्रगतीस बँकेचे संचालक व सेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेने व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे.
सुरुवातीला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना व अहवाल वाचन केला. उपव्यवस्थापक नारायण सगरे, प्रकाश डाके यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
यावेळी संचालक विष्णू सिसाळ, प्रकाश पाटील, मार्तंड सदामते, रंगराव नलवडे, महिपती जाधव, बजरंग सूर्यवंशी, जगदीश मोहोळकर, कृष्णा इदाटे, लालासाहेब संकपाळ, शिवप्रसाद शिंदे, रमेश राजमाने, चंद्रकांत गोंदिल, जनसंपर्क अधिकारी सुहास पुदाले, सर्व संचालक उपस्थित होते. मार्तंड सदामते यांनी आभार मानले.