शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पडळकरांच्या मतांमुळे प्रस्थापितांना धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:14 IST

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना

ठळक मुद्देत्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

अविनाश बाड  । आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ७८ हजार मते मिळाली. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरविणारी ही लोकसभा निवडणूक ठरली आहे.

खानापूर-आटपाडी आणि विसापूर मंडल या विधानसभा निवडणुकीचे गणित आजपर्यंत तरी प्रस्थापित नेते ज्या बाजूला, त्याच बाजूला मताधिक्य, असेच असल्याचे  स्पष्ट झाले आहे. आ. अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे नेते संजयकाकांच्या मागे होते. त्यामुळे संजयकाकांना या विधानसभा मतदारसंघात ७९,१७९ मते मिळाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांच्यासह कॉँग्रेसची नेतेमंडळी ‘स्वाभिमानी’चे उमेदवार विशाल पाटील यांच्यामागे असूनही त्यांना या विधानसभा मतदारसंघात केवळ ४३,८२९ एवढी मते मिळाली.

एकही प्रस्थापित नेता मागे नसताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ७८,०२४ एवढी मते मिळाली. संजयकाकांना केवळ १,१५५ मतांचे मताधिक्य पडळकरांपेक्षा जास्त आहे. विशाल पाटील यांना संजयकाकांपेक्षा तब्बल ३५,३५०, तर पडळकरांपेक्षा ३४,१९५ कमी मते मिळाली आहेत.२००४ च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिवराव पाटील ७९,८१३ मते मिळवून, तर २००९ मध्ये ७७,९६५ मते मिळवून विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये ७२,८४९ मते मिळवून आमदार अनिल बाबर जिंकले होते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला, तर प्रस्थापित नेत्यांना अस्वस्थ करणाराच लोकसभा निवडणुकीचा हा निकाल लागला आहे, असे म्हणावे लागेल.

अर्थात प्रत्येक निवडणुकीची रंगत वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत तालुक्याचा उमेदवार म्हणून मतदारांनी झुकते माप दिले. मात्र विधानसभेवेळी कोण कुणासमोर उभा राहणार, कुणाला कोण पाठिंबा देणार, यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे खरे असले तरी, निवडणूक यंत्रणेचा अभाव, नेत्यांची वानवा असताना ‘वंचित’च्या पडळकरांना मिळालेली मते निदान आमदारकीची स्वप्ने पाहणाºयांना आणि त्यांच्या चेल्यांना तरी काळजीत पाडणारी आहेत यात शंका नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर पडळकरांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल