शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विटा येथे रंगल्या पालखी शर्यती, मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीचा प्रथम क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:06 IST

सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटकावला. 

दिलीप मोहिते/विटा (सांगली) - सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटकावला. विटा येथे विजयादशमी निमित्त मुळस्थान श्री रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी 5 वाजता श्री काळेश्वर मंदिरापासून पालखी शर्यतीस सुरुवात झाली. प्रारंभी गांधी चौकातून दोन्ही पालख्या खानापूर रोडवरील शिलंगण मैदानाकडे झेपावल्या. मात्र विटा बँकेसमोर दोन्ही बाजूच्या भाविकांनी पालख्या अडविण्याचा प्रयत्न करत असताना त्या पडल्या. त्यातून सावरत विटा रेवणसिद्धची पालखी पुढे गेली. त्यानंतर मुळस्थानच्या पालखीने पुढे गेलेल्या पालखीला बसस्थानकच्या पुढे गाठले. खानापूर नाक्यावर विटा रेवणसिद्धची पालखी काही भाविकांनी रोखून धरल्याने पाठीमागून आलेल्या मुळस्थान रेवणसिद्ध देवाच्या पालखीने शिलंगण मैदानात धाव घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलं.. श्री रेवणसिद्ध देवाच्या नावानं चांगभलं.. चा गजर करीत भाविकांनी जल्लोष केला. त्यानंतर शिलंगण मैदानात उभा करण्यात आलेल्या वीस फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सीमोल्लंघन करण्यात आले. नेत्रदीपक पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. विजयादशमीचा हा सोहळा संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.