लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शाळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना घरी जाताना आणि येताना डिजिटलच्या माध्यमातून ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने गवळेवाडी (ता. शिराळा) येथील आपलं वाचनालय प्रतिष्ठानच्या सौजन्याने ‘आमचा गाव, आमचा विकास, शैक्षणिक प्रगतीसाठी डिजीटल खास’ या उपक्रमातून गावातील भिंती रंगवण्यात आल्या आहेत.
गवळेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे १ ते ४ वर्ग असून, ५३ पटसंख्या आहे. येथील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारल्याने ग्रामस्थांनी लाखो रुपये शाळेसाठी खर्च केले आहेत. कोरोना काळातही शाळेने उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर उंचावला आहे. शाळेच्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना घरी जाताना आणि येताना डिजिटलच्या माध्यमातून ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून आणि आपलं वाचनालय प्रतिष्ठानच्या सौजन्याने सर्व भिंतीवर विविध प्रकारची शालेय तसेच सार्वजनिक प्रकारची माहिती डिजिटल स्वरूपात मांडण्यात आली आहे. असा उपक्रम राबवणारे गवळेवाडी पहिले शैक्षणिक डिजिटल गाव बनले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मेणी केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे, सरपंच बाबासाहेब गोळे, वाचनालयाचे प्रवक्ते महादेव गोळे, सचिव श्रीहरी चिंचोलकर, सदस्य सूरज केसरे, हणमंत पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
या शैक्षणिक डिजिटल उपक्रमासाठी आबासोा शिंदे, मारुती यादव, विठ्ठल चिंचोलकर, विलास गवळी, राजेश घराळ, प्रकाश शेवाळे, विशाल कुंभार, सीताराम खटाटे, राजू कवर, संतोष यादव, महेश देसाई, मच्छिंद्र कुंभार, विजय आटकेकर, नेताजी हाप्पे, विष्णू शिंदे, दत्तात्रय केसरे, कृष्णात यादव, पाडुरंग केसरे, शिवाजी कदम, लक्ष्मण गोळे, वनिता निकम, आशाताई खटाटे यांनी सहकार्य केले.
गवळेवाडी येथील आपलं वाचनालय प्रतिष्ठानच्या सौजन्याने करण्यात आलेल्या शैक्षणिक डिजिटलचे तसेच मुख्याध्यापक अरुण पाटील, शिक्षक प्रकाश सावंत यांचे गावासह परिसरातून कौतुक होत आहे.
आपलं वाचनालय प्रतिष्ठानसाठी गावातील अनेक युवकांनी, ग्रामस्थांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शक्य तेवढी आर्थिक मदत जिल्हा परिषद शाळेस केल्याने शिक्षकांच्या सहकार्याने आदर्श शाळा बनविण्याचा ग्रामस्थांचा मनोदय असून, याला यश मिळेल.---------------बाबा गोळे, सरपंच, गवळेवाडी.