शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:50 IST

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दुप्पट म्हणजेच 12 के एल अतिरिक्त क्षमतेचा ऑक्सिजनचा टँक उपलब्ध केल्याने सर्व रुग्णांना दिलासा मिळला आहे. 

ठळक मुद्देमिरज कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन टँक अतिरिक्त क्षमतेचा रूग्णांना होणार लाभ-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली :   मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दुप्पट म्हणजेच 12 के एल अतिरिक्त क्षमतेचा ऑक्सिजनचा टँक उपलब्ध केल्याने सर्व रुग्णांना दिलासा मिळला आहे. 

वाढत्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एच. एफ. एन. ओ. या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली.

मिरज येथील रुग्णालयामध्ये 54 व्हेंटीलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणे गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध आहेत. तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते.

आत्तापर्यंत 6 के एल या क्षमतेचा ऑक्सीजन टँक होता. वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची क्षमता दुप्पट म्हणजेच 12 के एल करण्याचा निर्णय तात्काळ घेतला व अंमलबजावणी सुद्धा केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची तात्काळ व अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित उपचार होत आहेत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने शासनामार्फत आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते.

ऑक्सिजन टँकची क्षमता वाढविल्यामुळे सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी अधिक लक्ष घालून तत्पर कार्यवाही केल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.कोविड-19 ची वैश्विक साथ सुरू झाल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयामध्ये आजतागायत 1796 रुग्णांना उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामधील 1333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 73.55 आहे. रुग्णालयातील रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा चांगला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्के असून तो राष्ट्रीय निर्देशांकच्या बरोबर आहे.

आजतागायत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वायरल रीसर्च डिसीज लॅबोरेटरी ( श्फऊछ )मध्ये 49066 इतक्या स्वॅबच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातील 70.78 टक्के इतके रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत व पॉझिटिव्हिटी रिपोर्टची टक्केवारी 14.24 टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली