शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:32 IST

CoronaVIrus Sangli : सांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी विविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत करण्यात आली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढलाविविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत

संतोष भिसे सांगली : जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी विविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरीत करण्यात आली.जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा दररोज उच्चांक होत असल्याच्या स्थितीत ऑक्सिजनची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. मार्चमध्ये दररोज २० टनांची गरज होती, मेमध्ये ती ४५ टनांपर्यंत पोहोचली. सध्या जिल्हाभरात ८८ कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होतात. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे.

पंधरवड्यांपूर्वी कर्नाटकच्या बेल्लारीहून पुरवठा थांबल्याने पुण्यातून उपलब्ध करण्यात आला. दररोज ४० टन ऑक्सिजन पुण्यातून मिळत होता. रुग्णसंख्या वाढत असल्याने सांगलीचा कोटा आता ५४ टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे. पुणे व रायगड येथील खासगी कंपन्यांमधून पुरवठा होत आहे. दररोज चार ते पाच टँकर्स येत आहेत. जिल्ह्याची सध्याची मागणी सरासरी ४५ ते ५० टनांपर्यंत आहे, त्या तुलनेत सध्याचा पुरवठा पुरेसा ठरला आहे.

काही कोविड रुग्णालयांना परवानगी ऑक्सिजन उपलब्ध होत नाही म्हणून खोळंबली होती, ती आता मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्याची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोटादेखील वाढला आहे. शनिवारी १००० मिळाली, त्याशिवाय मिरज कोविड रुग्णालयांतही स्वतंत्र साठा आहे.मुंबई, पुण्याचे रुग्ण घटल्याचा फायदामुंबई आणि पुण्यातील रुग्णसंख्या घटल्याचा फायदा सांगलीला झाला आहे. या शहरांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स व फेविपिरॅवीर गोळ्यांची गरज कमी झाली, त्यामुळे सांगलीला अतिरिक्त कोटा मिळाला. महिन्याभरापूर्वी सांगलीची रेमडेसिविरची दररोजची गरज १००० इंजेक्शन्सची असताना उपलब्धता मात्र १०० पेक्षाही कमी होती. आज मात्र दिवसभरात १००० इंजेक्शन्स देण्यात आली.दृष्टीक्षेपात उपलब्धता...

  •  ऑक्सिजन - ५४ टन
  • रेमडेसिविर इंजेक्शन्स - १०००
  •  एकूण कोविड रुग्णालये - ८८

सांगलीचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला आहे. पुणे व रायगडमधून पुरवठा होईल. त्यामुळे सध्याची गरज भागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सदेखील जास्त प्रमाणात मिळत आहेत.- नितीन भांडारकर,सहाय्यक आयुक्त, अन्न व अ‍ौषध प्रशासन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरSangliसांगली