शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखावरील थकबाकी ५१.५३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:43 IST

सांगली : दोन लाखापेक्षा जादा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. ही कर्जमाफी झाल्यास जिल्हा ...

ठळक मुद्देदोन लाखावरील थकबाकी ५१.५३ कोटी बॅँकेकडील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांना लाभ

सांगली : दोन लाखापेक्षा जादा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. ही कर्जमाफी झाल्यास जिल्हा बॅँकेकडील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, त्यांची थकबाकी ५१.५३ कोटी रुपये आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रूपयांचे पीककर्ज माफीची घोषणा केली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी, शेतकºयांचे दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे पीककर्जही सरकार माफ करणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता या शेतकºयांना कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा लागली आहे.शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५२ हजार ७१४ शेतकरी दोन लाखापर्यंतच्या पीककर्ज माफीला पात्र ठरत आहेत. त्यांची थकबाकी ५८३ कोटी ३५ लाख रुपये आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात पीककर्ज असा उल्लेख आहे.

मात्र ते अल्प, मध्यम व दीर्घ मुदत यापैकी कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, याच्या स्पष्ट सूचना अद्याप बँकांना आलेल्या नाहीत. पीक कर्जाचा उल्लेख असल्याने केवळ अल्प मुदतीचे पीक कर्जच माफ होणार असल्याचे सरकारी व बँकांच्या सूत्रांनी सांगितले.यात जिल्ह्यातील ५२,७१४ शेतकरी पात्र ठरतील. त्यांचे ५८३.५३ कोटींचे थकीत कर्ज माफ होईल. जिल्हा बॅँकेचे दोन लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी ४ हजार ८१५ आहेत. त्यांची एकूण थकबाकी ५१ कोटी ५३ लाख रुपये आहे.यात अल्प मुदतीचे २७९८ शेतकऱ्यांचे ३०.७० कोटी, मध्यम मुदतीचे १२०४ शेतकऱ्यांचे १३.०१ कोटी, तर दीर्घ मुदतीच्या ८१३ शेतकऱ्यांचे ७.८१ कोटींचे कर्ज थकीत आहे. दोन लाखावरील कर्जमाफीचा निर्णय झाल्यास या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

टॅग्स :bankबँकSangliसांगली