शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

विट्यातील गाळे काढून घेण्याचे आदेश

By admin | Updated: May 28, 2016 00:53 IST

बांधकाम समितीत निर्णय : कणेगावच्या कमानीचा प्रस्ताव फेटाळला

सांगली : विटा येथील जिल्हा परिषदेच्या दुकान गाळ्यांतील सहा दुकानदारांनी कराराचा भंग केला आहे. यामुळे त्यांच्याकडील गाळे काढून घेऊन ते अन्य व्यक्तींना भाड्याने देण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालय यांच्याकडून भाड्याची थकीत रक्कम आठ दिवसात वसूल करण्याचा निर्णय झाला. तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील दोन व्यक्तींनी स्वागत कमानीसाठी प्रस्ताव पाठविल्यामुळे दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात आले. ग्रामपंचायतीने तेथील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून दोन्ही स्वागत कमानींच्या जागा निश्चित करून फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.सभापती भाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. विटा येथील खानापूर पंचायत समितीच्या उत्पन्नातून गाळे बांधले आहेत. या गाळ्यांचा अनधिकृत वापर सुरु असल्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच दोन संस्थांनी अनधिकृत बांधकाम केल्यावरूनही दोन सभांमध्ये वादळी चर्चाही झाली होती. दोन्ही संस्थांनी तोडगा काढून वाद मिटविला. परंतु, गाळ्यांच्या थकीत भाड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच काही गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे भाडे वसुलीचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असला तरी, यावेळी काही गाळेधारकांनी कराराचा भंग केला आहे. या कायद्यानुसार त्यांचे गाळे खाली करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.त्यानुसार गाळेधारकांकडून गाळे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालयाकडून थकीत भाडे वसूल करण्याचाही निर्णय घेण्यात आला.कणेगाव येथील भीमराव आत्माराम पाटील यांनी स्वखर्चातून स्वागत कमान बांधण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत २७ एप्रिल २०१२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. या गटाची सत्ता गेल्यानंतर अ‍ॅड्. विश्वासराव संपतराव पाटील यांनी स्वखर्चातून कमान बांधण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रस्ताव दिला आहे. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला. रस्त्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडील रस्त्यांना निधी मिळत नाही. यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी सदस्य सुरेश मोहिते यांनी केली. कडेगाव तालुक्यातील सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे ठरले. भाऊसाहेब पाटील म्हणाले की, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी ३६ कामांसाठी तीन कोटी १९ लाखाचा निधी मंजूर आहे. खानापूर तालुक्यातील बारा रस्त्यांच्या कामासाठी आठ कोटी ११ लाख आणि तासगाव तालुक्यातील सात कामांसाठी चार कोटी ९९ लाख मंजूर आहेत. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला.