शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला देशी दारू दुकानास विरोध

By admin | Updated: April 18, 2017 23:19 IST

कुपवाडला देशी दारू दुकानास विरोध

कुपवाड : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नवीन देशी दारू दुकानास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी जिल्हा सुधार समितीच्यावतीने मंगळवारी सकाळी महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांच्या विरोधात कुपवाड महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रभाग कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील समस्यांबाबत सुधार समितीच्यावतीने प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच प्रभागात समस्यांचा महापूर असताना, नवीन दारू दुकानाला परवानगी देणे म्हणजे समस्यांमध्ये आणखी भरच पडणार आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. नागरिकांची नाराजी ओळखून समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कुपवाड प्रभाग समिती कार्यालयासमोर सुधार समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, समस्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी हे निवेदन कार्यालयातील खांबाला लावले. तसेच याबाबत पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी निष्क्रिय नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आंदोलनामध्ये वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चोपडे, कल्पना कोळेकर, सुनील गिड्डे, मधुकर शेडबाळकर, सुनील पाटील, संध्याराणी दुधाळ, आसिफ मुजावर, अर्चना खोंदे, मुकुंद साबळे, नितीन सरोदे, पिराजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)