शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोध डावलून वड्डीमध्ये हाडांच्या गोदामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:33 IST

महापालिकेच्या बेडग रस्त्यावर कत्तलखान्याची जागा हाडे व कातडी गोदामासाठी देण्यास नगरसेवक, वड्डी गावच्या नागरिकांनी विरोध करूनही हा ठराव बुधवारी महासभेत मंजूर करण्यात आला. यावेळी वहिदा नायकवडी यांनी टेबलाखालून हा विषय आणल्याचा आरोप केल्याने सभेत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे सभेत काहीकाळ गोंधळ झाला.

ठळक मुद्देविरोध डावलून वड्डीमध्ये हाडांच्या गोदामास मंजुरीसभेत भाजपचे नगरसेवक आक्रमक

सांगली : महापालिकेच्या बेडग रस्त्यावर कत्तलखान्याची जागा हाडे व कातडी गोदामासाठी देण्यास नगरसेवक, वड्डी गावच्या नागरिकांनी विरोध करूनही हा ठराव बुधवारी महासभेत मंजूर करण्यात आला. यावेळी वहिदा नायकवडी यांनी टेबलाखालून हा विषय आणल्याचा आरोप केल्याने सभेत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे सभेत काहीकाळ गोंधळ झाला.बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याची एक गुंठा जागा हाडे व कातडी ठेवण्यास केवळ साडेसहाशे रुपये मासिक भाड्याने देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर होता. या प्रस्तावाला नगरसेवकांनीही विरोध केला. मिरज पंचायत समितीच्या सभेतही जागा देण्यास विरोध केला होता. वड्डी ग्रामस्थांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते.महासभेत वहिदा नायकवडी यांनी या विषयाला विरोध केला. तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी विषयपत्रात ताशेरे ओढले होते. तत्कालीन मिरज नगरपालिकेने १९९१ मध्ये ही जागा दिली. २००८ मध्ये शेड पाडून ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली. आता कोणाला तरी खूश करण्यासाठी टेबलखालून हा विषय चर्चेला आणल्याचा आरोप केला. त्यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा आरोप फेटाळून लावला.भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी नायकवडी यांच्या आरोपावर आक्षेप घेतला. नायकवडी यांनी आरोप मागे घेऊन सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली. अखेर हारुण शिकलगार यांनी नायकवडींचे शब्द कामकाजातून काढून टाकावेत व सभेचे कामकाज पुढे सुरू करण्याची विनंती महापौरांना केली. त्यामुळे वादावर पदडा पडला.

सागर घोडके, अभिजित भोसले म्हणाले, घनकचरा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास ही जागा बदलून देण्याची अट घातली आहे. हा चुकीचा कारभार आहे. आराखडा अंमलबजावणी होऊ द्या, तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवा. मात्र महापौर गीता सुतार यांनी बहुमताने हा विषय मंजूर केला. या ठरावाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचेही समर्थन मिळाले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली