शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी दोनतरी गावं दत्तक घ्यावीत

By admin | Updated: May 29, 2017 23:10 IST

विरोधकांनी दोनतरी गावं दत्तक घ्यावीत

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड/मलकापूर : ‘गेल्या अडीच वर्षांत आम्ही राज्यासमोरील सर्व प्रश्न सोडविले असा आमचा दावा मुळीच नाही. पण आम्ही मंडळी प्रामाणिकपणे काम करत आहोत हे जनतेला माहीत आहे. म्हणूनच विरोधकांनी कितीही रान उठविण्याचा प्रयत्न केला तरी जनता ही भाजपबरोबरच असल्याचे अनेक निवडणूकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे विरोधकांनीही आपली ऊर्जा उगाच वाया न घालविता सकारात्मक दृष्टीने खर्च करावी. एक दोन गावे दत्तक घ्यावीत,’ असा उपरोधीक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तमाम जनतेचा विश्वास आहे. अन् त्यांच्या नेतृत्वाखालीच या देशाचं भलं होऊ शकते. त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या सरकारने शेतीकडे मदत अन् पुर्नवसनच्या पलीकडे कधी बघितलेच नाही. आमचे सरकार मात्र शेतीकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहत आहे. २६ हजार कोटी रूपये आम्ही सिंचन योजनांसाठी खर्च करीत आहोत. ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात म्हणून प्रोत्साहन देत आहोत. गत पंधरा वर्षांत तत्कालिन सरकारने हे कृष्णा खोरे प्रकल्प मार्गी लावणे अपेक्षीत होते. त्यासाठी कोट्यवधींचा निधी आला पण तो कुठे गेला हे समजायला मार्ग नाही.’डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचे भाषण झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.