शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

शासनाच्या जागा केल्या खुल्या

By admin | Updated: January 13, 2016 23:17 IST

संजयनगरमध्ये कारवाई : अतिक्रमण पथकाने पाच खोकी हटविली

 सांगली : शहरातील संजयनगर येथील राज्य शासनाच्या १३.३६ गुंठे जागेवर केलेले अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने बुधवारी उद्ध्वस्त केले. या जागेवर तिघांनी पत्र्याचे शेड मारून रुग्णालय, अंगणवाडी, वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले होते. याच परिसरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाच खोकीही हटविण्यात आली. संजयनगर येथील जगदाळे प्लॉटमधील साठफुटी रस्त्यालगत अर्बन लँड सिलिंगमधील १३.३६ गुंठे जागा राज्य शासनाच्या नावावर आहे. या जागेसंदर्भात मालक व शासनात न्यायालयीन दावाही सुरू आहे. शासनाचे नाव लागले असले तरी, मूळ मालकाला नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे मूळ मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही. त्यात नगरसेवक सुनील कलकुटगी यांनी, या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण याची त्यांनी दखल न घेतल्याने कलकुटगी यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली. नगरविकासच्या कक्ष अधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी महापालिकेच्या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. पालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे, अभियंता आप्पा हलकुडे, नगररचनाचे संजय कांबळे यांच्या पथकाने दुपारी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या जागेवर एकाने रुग्णालय सुरू केले होते. त्याच्याशेजारीच अंगणवाडी व वेल्डिंगचे वर्कशॉप होते. बाजूच्या एका प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड उभारले होते. त्यानंतर या पथकाने संजयनगर शंभरफुटी रस्त्यावरील बीएसएनएलजवळील खोक्यांवर कारवाई केली. या ठिकाणी नव्याने खोकी उभारण्यात आली होती. या कारवाईला खोकीधारकांनी सुरूवातीला विरोध केला. नोटीस न देता खोकी हटवू नका, अशी भूमिका घेतली. पण अधिकाऱ्यांनी, खोकी उभारताना पालिकेची परवानगी घेतली होती का? आता कशाला नोटीस हवी? असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर त्याठिकाणची पाच खोकी हटविण्यात आली. अजूनही या रस्त्यावर ५० खोकी असून तीही हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) धनदांडग्यांची अतिक्रमणे हटवा : संभाजी पवार शहरात अनेक धनदांडग्यांनी रस्त्यावर बंगले, शोरूम, दुकाने थाटली आहेत. त्यांचे अतिक्रमण हटविण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे. मग गोरगरिबांवर हातोडा टाकावा. सध्याची अतिक्रमण हटाव मोहीम राजकीय दबावाने सुरू आहे. त्याबद्दल जनतेत असंतोष आहे. प्रशासनाने आधी हातगाडी, फेरीवाले, विक्रेते यांचे पुनवर्सन करावे, त्यांना नोटिसा द्याव्यात, मगच कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन उभे करावे लागले, असा इशारा माजी आमदार संभाजी पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.