हरिपूर : जयहिंद व्यायाम मंडळातर्फे सांगलीत २६ डिसेंबरपासून राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील चषक खुल्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार पाटील तसेच सचिव राजेंद्र पाटील यांनी दिली़ दि. २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा होतील़ स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़ राज्यभरातील बारा नामांकित संघ स्पर्धेत सहभागी होतील़ उद्घाटन २६ रोजी दुपारी दोन वाजता डॉ़ दिलीप मगदूम यांच्याहस्ते होणार आहे़ २८ रोजी दुपारी साडेचार वाजता खा़ संजय पाटील यांच्याहस्ते बक्षीस समारंभ होईल़ यावेळी पोलीसप्रमुख दिलीप सावंत व प्राचार्य डॉ़ भास्कर ताम्हणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ २००९ पासून या स्पर्धा अखंडितपणे सुरू आहेत़ स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे आहेत : महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर), ध्यानचंद स्पोर्टस् अॅकॅडमी (सांगली), सुभद्रा फौंडेशन (इस्लामपूर), श्याम क्लब (कोल्हापूर), वासू स्पोर्टस् (हुबळी), विक्रम पिल्ले अॅकॅडमी (पुणे), पद्मा पथक (कोल्हापूर), हॉकी क्लब (सोलापूर), सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन (फलटण), खासदार एस़ डी़ पाटील ट्रस्ट (इस्लामपूर), छावा स्पोर्टस् (कोल्हापूर), दिग्विजय नाईक फौंडेशन (इचलकरंजी)़ (वार्ताहर)२००९ : सांगली पोलीस (सांगली)२०१० : छावा (कोल्हापूर)२०११ : वेस्टर्न रेल्वे क्लब (हुबळी)२०१२ : सुभद्रा फौंडेशन (इस्लामपूर)२०१३ : यंगस्टार क्लब (हुबळी)२०१४ : ?
सांगलीत उद्यापासून खुल्या हॉकी स्पर्धा
By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST