सांगली : रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील बेडची उपलब्धता कमी होत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील आयसीयूचे ९४ टक्के बेड तर वॉर्डमधील ७५ टक्के बेड रुग्णांनी व्यापले होते. जिल्ह्यात केवळ ६ टक्केच आयसीयू बेड सध्या शिल्लक आहेत.
जिल्हा प्रशासनाने खाटांच्या उपलब्धतेची आकडेवारी गुरुवारी सकाळी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात आयसीयूचे एकूण ७७८ बेड आहेत. त्यातील केवळ ५२ उपलब्ध आहेत, तर २ हजार ४२३ वॉर्ड बेडपैकी केवळ ६२७ बेड शिल्लक आहे. त्यामुळे कोविड रुग्णालये, कोविड सेंटर्सवरील ताण वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. अशावेळी रुग्णांना बेड मिळणे कठीण बनले आहे. रुग्णांना वाहनात घेऊन त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही बेड मिळण्याची खात्री नाही.
यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या संकेतस्थळावर बेडची उपलब्धता किती आहे, याची माहिती तासातासाने अपडेट करत आहे. याशिवाय कोरोना हेल्पलाईन सेवाही सुरु केली आहे. तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड मिळणे व तातडीने उपचार होणे आता कठीण बनत चालले आहे.
चौकट
आयसीयू बेडची उपलब्धता ६ टक्के
वाॅर्ड बेडची उपलब्धता २५ टक्के
एकूण सर्वप्रकारच्या बेडची उपलब्धता १७ टक्के
दररोज वाढणारे रुग्ण १५०० ते १८००
चौकट
कोविड रुग्णालयातील रुग्ण
१ मे १८९६
२ मे १९१८
३ मे १९१५
४ मे १९६४
५ मे १९७३
सध्याची कोरोना स्थिती
एकूण बेड
एकूण ॲक्टिव्ह रुग्ण १४७४६
गृह अलगीकरणातील ११५५६
एकूण बेड ३८७०
शिल्लक बेड (आयसीयू व वॉर्ड) ६७९
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ताण
महापालिका क्षेत्रात सध्या कोविड रुग्णालयांची व केंद्रांची संख्या मोठी असली, तरी सर्वाधिक ताण येथील यंत्रणेवर पडत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील केवळ २ टक्के आयसीयू बेड शिल्लक होते.
चौकट
रुग्णालयात जाईपर्यंत बेड फुल्ल
हेल्पलाईन सेंटरमध्ये विचारणा करुन बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जाईपर्यंत अनेकदा बेड अन्य रुग्णांना दिले जातात, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. बऱ्याचदा ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना असा अनुभव येत आहे.