शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरण, प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:03 IST

Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्देजत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरणतालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद

सांगली : जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.जिल्ह्यात आजवर ७ लाख ३८ हजार ९९५ जणांना पहिला डोस तर २ लाख १२ हजार ८०१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ३२ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये कमी झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेऊन सांगितले की, जतमध्ये लोकप्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत जनजागृती करावी. लसींचा जादा पुरवठा करावा. लसीकरण केंद्रेही वाढवावीत. खासगी लसीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी करावी. तेथे आवश्यक सुविधा आवश्यक आहेत. या केंद्रांना मंजुरी देता नियमांची पुर्तता आवश्यक आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिम, अतिसार नियंत्रण पंधरवडा, रोगप्रतिकारशक्ती वृध्दी कार्यक्रम आराखडा आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलींद पोरे, लसीकरण समन्वयक डॉ. विवेक पाटील, डॉ. वैभव पाटील आदी उपस्थित होते.आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्याची सूचना त्यांनी केली. नगरपालिका, नगरपरिषद हद्दीत लसीचा पुरेसा साठा देण्यास सांगितले. सध्या ३७७ लसीकरण केंद्रे असून यामध्ये ३९ खासगी आहेत.तालुकानिहाय लसीकरणाची टक्केवारी अशी-आटपाडी ३४, जत २०, कडेगाव ३७, कवठेमहांकाळ ३४, खानापूर २८, मिरज ३३, पलूस ३०, शिराळा ४२, तासगाव ३६, वाळवा ३८, महापालिका २८, जिल्हा एकूण ३२ टक्के.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली