स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीचा शुभारंभ सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेेंद्र डुडी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीचा शुभारंभ मंगळवारी झाला. जिल्हा परिषदेत अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बचग गटाची ३९ उत्पादने ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करण्यात आली.
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ढालगावच्या हिरा गटाने जेन, घोंगडी, पायपुसणी, चप्पल, योगासाठी चटई आदी उत्पादने तयार केली आहेत. ॲमेझॉन ऑनलाईन पोर्टलवर ती विक्रीसाठी उपलब्ध झाली. यावेळी डुडी यांनी उत्पादनांची गुणवत्ता, पॅकिंग, मार्केटिंग आदींविषयी मार्गदर्शन केले. सर्व बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू कृष्णामाई ब्रॅण्डखाली ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध केल्या जातील असे ते म्हणाले. यावेळी शिक्षण सभापती आशा पाटील, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अभियान व्यवस्थापक अतुल नांद्रेकर आदी उपस्थित होते.