सांगली : उन्हाळ्यात मागणी अधिक वाढत असल्याने लिंबाने भलताच भाव खाल्ला आहे. सध्या सांगलीच्या बाजारात लिंबाची ५ रुपयाला एक नग याप्रमाणे विक्री सुरू आहे. त्यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर लिंबू गेला आहे. उन्हाळ्याची तीव्रता येत्या दोन महिन्यात आणखी वाढणार असून लिंबाचे भावही वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
सांगलीत आज मोलकरणींचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयटक संलग्न महाराष्ट्र मोलकरणी व घर कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी ३१ मार्च रोजी मोलकरणी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सांगली जिल्हा निवारा संघाच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी दिली.
ड्रेनेजच्या रखडलेल्या कामास सुरुवात
सांगली : माधवनगर परिसरातील शिवोदयनगरमध्ये गेली महिनाभर ठप्प असलेले ड्रेनेजचे काम मंगळवारपासून पुन्हा सुरू झाले. येथील नागरिकांनी रेंगाळलेल्या कामाबाबत संताप व्यक्त केल्यानंतर ड्रेनेज ठेकेदाराने अखेर कामास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.