---
आष्टा येथे एकास विषबाधा
सांगली : आष्टा येथे एकास विषबाधा झाली. अमोल विलास घबक (वय ४) असे त्यांचे नाव असून सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
मालगाव येथे तरुणास मारहाण
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथील तरुणास दगडाने मारहाण करण्यात आली. पृथ्वीराज प्रतापसिंह भंडारे (वय २४) असे जखमीचे नाव आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलो आहे.
---
सांगलीवाडीत एकास मारहाण
सांगली : सांगलीवाडी येथे एकास चौघांकडून मारहाण करण्यात आली. दिलीप आत्माराम जाधव (वय ५०) असे जखमीचे नाव असून रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.