शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली आगारांना मिळणाऱ्या १०० बसेस वेटिंगवर, ठेकेदार म्हणतोय..; एसटीचे वेळापत्रक कोलमडले

By अशोक डोंबाळे | Updated: February 4, 2023 18:15 IST

सांगली आगारात १० वर्षांपेक्षा जास्त वापरलेल्या ३५४ बसेस

सांगली : जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांना ८५० बसेसची गरज असताना सध्या केवळ ७०० बसेस कार्यरत आहेत. खासगी कंपनीकडून फेब्रुवारीमध्ये १०० बसेस मिळणार होत्या; पण त्या तयार नसल्यामुळे ठेकेदारानेही सांगली विभागास मार्चपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे. कमी बसेसमुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे.राज्य शासनाने एसटी बसेस खासगी कंपनीकडून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली विभागाकडे ९०० बसेस होत्या. तेरा वर्षांनंतर त्या कालबाह्य धरून भंगारात विक्री होती. त्यानुसार आतापर्यंत २०० कालबाह्य बसेस टप्प्या-टप्प्याने भंगारात घातल्यामुळे सध्या ७०० बसेस शिल्लक आहेत. यामध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वापरलेल्या ३५४ बसेस आहेत. सध्या एसटीकडे प्रवाशांची गर्दी असूनही बसेसची टंचाई आहे.जिल्ह्यातील दहा आगारांसाठी २०० बसेसची मागणी केली होती. एसटी महामंडळाने खासगी ठेकेदाराकडून या बसेस देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये १०० बसेस दि. १ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे मान्य करून तसा करार झाला होता; पण नवीन बसेस तयार नसल्यामुळे ठेकेदाराने मार्चपर्यंत थांबावे लागेल, असे उत्तर दिले आहे.यामुळे एसटीचे प्रवासी वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन हंगामात हे घडले आहे. प्रवाशांना उन्हाचा पारा सहन करत बसची वाट पाहावी लागत आहे.नवीन ६० बसेस फेब्रुवारीअखेरीसएसटीकडे २०० नवीन बसेसची मागणी केली आहे. ठेकेदाराने फेब्रुवारीअखेर ६० नवीन बसेस देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित बसेस मार्च महिन्यात मिळणार आहेत, अशी माहिती सहायक वाहतूक अधीक्षक विक्रम हांडे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली