शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sangli: थरारक शर्यतीत विट्याच्या पालखीने मारली बाजी; दोन्ही गटात जोरदार रेटारेटी, मारझोड

By हणमंत पाटील | Updated: October 25, 2023 18:00 IST

सुमारे दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा

दिलीप मोहिते विटा : सुमारे दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या विटा (जि. सांगली) येथे विजयादशमी दिवशी श्री रेवणसिद्ध देवाच्या दोन पालख्यांची थरारक शर्यत झाली. त्यामध्ये तब्बल पाच वर्षांनी विट्याच्या श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने बाजी मारली. पालखी सोहळ्याला उपस्थित लाखो भाविक यांनी दोन्ही गटात शर्यतीवेळी झालेली रेटारेटी, तुडवातुडवी, मारामारी पहिली. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.विजयादशमीला विटा आणि सुळेवाडी येथील देवांच्या पालखी शर्यती पार पडल्या. मंगळवारी दुपारी सुळेवाडी व विटा येथील श्री रेवणसिद्ध या एकाच देवाच्या दोन पालख्या सायंकाळी पाच वाजता श्री काळेश्वर मंदिरासमोर शर्यतीसाठी आल्या. सुळेवाडीच्या पालखीला पाच पाऊल पुढे थांबण्याचा परंपरेनुसार मान दिला. सव्वा पाच वाजता पालख्यांची शर्यती सुरू झाली.

सुरुवातीला दोन्ही पालख्या एकमेकांना खेटून होत्या. पालख्यांचे समर्थक खांदेकरी पालखी पुढे नेण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी विटा बॅँकेसमोर सुळेवाडीच्या मूळ स्थानाची पालखी उजव्या बाजूला ढकलली गेली. विट्याच्या समर्थकांनी पालखी रोखल्याने सुटका करून घेण्यासाठी एकमेकांत हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांनीही पालखी रोखणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला.तोपर्यंत विट्यातील पालखी पुढे गेली. मूळ स्थान सुळेवाडीच्या पालखीने तितक्याच जोमाने आगेकूच केली. त्यावेळी विट्याच्या पालखीला मूळ स्थानच्या खांदेकरी समर्थकांनी अडवून धरल्याने मूळ स्थानची पालखी पुढे निघून गेली.

खानापूर नाक्यावर विट्यातील सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी मूळ स्थानच्या पालखीला अडवून धरले. त्यावेळीही पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांचा मार खाऊनही विट्याच्या समर्थकांनी पालखी सोडली नाही. तोपर्यंत विट्याच्या पालखीने वेगात येऊन विजयाची पताका फडकविली. पाच वर्षांनंतर विट्याच्या श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने यावर्षीची शर्यत जिंकली आणि विटेकरांनी एकच जल्लोष केला.

कडक पोलिस बंदोबस्तपालखी शर्यतीसाठी उपअधीक्षक पद्मा कदम व पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. या बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले होते.

रेटारेटीच्या प्रकारात वाढअनेक वर्षांपासून पालखी शर्यती होतात. परंतु, प्रत्येक वर्षी पालख्या पाडणे, रेटारेटी करणे, पालख्या अडविणे अशा प्रकारांत वाढ होत आहे. यावर्षी या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्षानुवर्षे परंपरा असलेल्या या शर्यती पोलिसांचा लाठीमार, खांदेकरी समर्थकांतील हाणामारी, पाडापाडीने वेगळ्या वळणावर पोहोचली असल्याचे दिसले.

टॅग्स :Sangliसांगली