शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By संतोष भिसे | Updated: March 16, 2023 16:48 IST

संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम

सांगली : सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संपाच्या तिसऱ्या दिवशी सांगलीत मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शासकीय धोरणांविरोधात घोषणाबाजी करत जुन्या पेन्शनसाठी आवाज बुलंद केला.हम होंगे कामयाब असा नारा देत आदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी सकाळी विश्रामबागमध्ये क्रांतिंसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. ढोलताशांच्या निनादात कर्मचाऱ्यांनी ठेक्यावर घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. सांगली व मिरज शासकीय रुग्णालय, कृषी विभाग, महसूल, शिक्षण आदी विभागांचे कर्मचारी मोर्चात सामील झाले. शासकीय रुग्णालयाच्या पारिचारिकांनी अखंड घोषणाबाजी करत मोर्चामध्ये चैतन्य कायम राखले.मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट मिटींगमध्ये झाले. आंदोलकांचे नेते डी. जी. मुलाणी, प्रकाश काळे, संजय व्हनमाने, प्रतिभा हेटकाळे आदींनी भूमिका मांडल्या. जुनी पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. व्हनमाने म्हणाले, आमदार-खासदारांना गलेलठ्ठ पेन्शन देणाऱ्या सरकारने आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे सहन केले जाणार नाही. प्रतिभा हेटकाळे म्हणाल्या, आम्ही आमच्या  हक्काची पेन्शन मागत आहोत. हा लढा आमचा स्वत:चा तर आहेच, शिवाय भविष्यात नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही आहे. 

महिला आक्रमकमोर्चामध्ये महिला कर्मचारी अग्रभागी होत्या. शेवटपर्यंत आक्रमक राहून त्यांनी मोर्चाचे नेतृत्व सांभाळले. अखंड घोषणाबाजीने आंदोलनस्थळी वातावरण निर्मिती केली.

हम होंगे कामयाब...जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी `हम होंगे कामयाब एक दिन, जुनी पेन्शन लेके रहेंगे एक दिन` या गाण्यावर ताल धरत आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी मोर्चासाठी आले होते.

जिल्हा परिषदेत ठिय्याजिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच ठिय्या मारला होता. महिला व पुरुष कर्मचारी जुनी पेन्शन मागणीच्या टोप्या घालून प्रवेशदारात बसले होते. कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन