शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोन दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

By शरद जाधव | Updated: February 25, 2023 21:47 IST

शहरातील कोल्हापूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, शरद जाधव, सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. माधव लक्ष्मण जोशी (वय ८० रा. रुक्मिणीनगर, सांगली) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील बसवराज जिनाप्पा कावळे (वय २३ रा. कर्नाटक) हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रूक्मीणीनगर परिसरात मृत माधव जोशी हे एकटेच राहण्यास होते. मुंबईतील शिपयार्डमधील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते सांगलीत राहण्यास आले होते. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ते मोपेडवरून सांगलीकडे येत होते. याचवेळी दुसरा दुचाकीस्वार बसवराज कावळे हा त्याच्या दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. कोल्हापूर रस्त्यावर हॉटेल उदय डिलक्ससमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. 

यात रस्त्यावर पडल्याने जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी कावळे याने हेल्मेट घातले असल्याने तो किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रूग्णालयात हलविला. रात्री उशिरा शहर पोलिसात घटनेची नोंद झाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघात