लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून गाव पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली येथे मंगळवारी बांबवडे (ता. शिराळा) येथील भाजपच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्यांसह पार्टीप्रमुखांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्या वेळी आ. मानसिंगराव नाईक बोलत होते. ‘विश्वास’चे संचालक विश्वास पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
आ. नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील सर्वात मोठा आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते विकासाच्या प्रवाहात किंबहुना राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत.
भाजपचे बांबवडे येथील ग्रामपंचायत सदस्य निवास दत्तू ताटे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत जांभळे, हणमंत गावडे, विजय शेळके, भाजप युवक कार्यकारिणी सदस्य यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आ. नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सुकुमार पाटील, संजय पाटील, आत्माराम हिंगणे, सर्जेराव कौचाळे, भारत माने, जयसिंग जाधव, हैबती माने, किरण बारपटे, वसंत झेंडे, हौसेराव माने, भाऊसो माने, विजय धुमाळ आदी उपस्थित होते.