शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अधिकाऱ्यांचे वेळेवर, शिक्षकांचेच पगार उशिरा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला ...

सांगली : कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारासाठी महिन्याला ३७ कोटींची गरज आहे. शासनाने एप्रिल महिन्याचे वेतन अनुदान अजूनही जमा केले नसल्याने शिक्षकांचे वेतन झालेले नाही. कोरोनाचे संकट तोंडावर असताना, अनेक शिक्षकांना त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असताना, वेळेवर पगार होत नसल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये राज्यात सर्वात मोठी संख्या शिक्षण क्षेत्रातील आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील शिक्षकांच्या वेतनासाठी महिन्याला ३७ कोटी रुपये लागत आहेत. सध्या कोरोनामुळे राज्य सरकारने अनेक योजनांवर अंकुश लावला आहे. अनावश्यक खर्चाला परवानगी नाकारली आहे. कार्यालयीन खर्चातही काटकसर करण्याचे निर्देश दिले आहे. सरकारचे संपूर्ण लक्ष हे आरोग्याकडे आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शासन शिक्षकांच्या वेतनाचे अनुदान तीन ते चार महिन्याचे एकाच वेळी देत होते. आता मात्र वेतन अनुदान एकाच महिन्याचे दिले जाते. त्यातही प्रशासकीय दिरंगाईमुळे वेतनही वेळेवर मिळत नाही. पण यंदा एप्रिल महिन्याचे वेतन अनुदान अजूनही जमा झाले नाही. त्यामुळे एप्रिलचा शिक्षक व शिक्षकेतरांचा पगार थांबला आहे. कोरोनाच्या या संकटातही अधिकाऱ्यांचे पगार मात्र महिन्याच्या एक तारखेला कसे होतात, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

चौकट

१ तारखेला कधीच पगार होत नाही !

शासनाचे निर्देश आहे की, शिक्षकांचे पगार १ तारखेला मिळायला हवे. पण १ तारखेला कधीच पगार झाला नाही. शासनाने वेतन अनुदान दिल्यानंतर बीईओंकडून शिक्षकांचे वेतन बिल शिक्षण विभागात पाठविले जाते. वेतनाचे बिल पाठविण्यात बीईओंकडूनच उशीर होतो, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचारी सर्व बिल गोळा करून वित्त विभागाकडे पाठविले जाते. बीईओंकडून वेळेवर बिल येत नसल्याने पगार बिल वित्तकडे पाठविण्यासाठी उशीर होतो. वित्त विभागाकडे पगार बिल गेल्यानंतर गतीने प्रक्रिया होत नाही. त्यामुळे १ तारखेचा पगार २० ते २५ तारखेला होतो, असा शिक्षकांचा आरोप आहे.

चौकट

- दृष्टिक्षेपात

शाळा - १६८८

शिक्षक - ६५००

चौकट

कोरोनाच्या संकटात पगार नाही मिळाला

एप्रिल महिन्याच्या शेवटी मला कोरोनाची बाधा झाली. खासगी रुग्णालयात भरती करावे लागले. मार्चचा पगार झाला नाही. पैशाची जुळवाजुळव करून दाखल झालो. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. हातात पुरेसा पैसा नव्हता. शेवटी शिक्षक मित्रांनी आकस्मिक कर्ज उचलून गरज भागविली, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली.

कोट

अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय बँका, शिक्षक पतसंस्थेतून गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक कर्ज घेतले आहे. एक महिना पगार उशिरा होत असल्याने कर्जाचे हप्ते थकीत झाले आहेत. अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड आणि दंडही बसत आहे. कोरोना संक्रमण काळात लसीकरणासाठी जनजागृती, लसीकरण केंद्रावर, आरोग्य केंद्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हेल्पलाईन रुम आदी ठिकाणी शिक्षक सेवा देत आहेत. तरीही शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत.

-प्रमोद काकडे, अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना.

कोट

गेल्या वर्षभरात शिक्षकांचे कधीच वेळेवर पगार झाले नाहीत. प्रत्येक महिन्यात शिक्षकांचे पगार किमान वीस दिवस उशिरा होत आहेत. शिक्षकांनी घर बांधणीसह मुलांचे शिक्षण आणि अन्य कारणांसाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. या कर्जाचे हप्ते वेळेत भरले नाही तर त्यावर दंड भरावा लागतो. कौटुंबिक खर्चासाठीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्हा परिषदेने शिक्षकांचे पगार १ तारखेला व्हावेत, यासाठी प्रयत्न करावेत.

-महेश शरनाथे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना.

कोट

शासनाकडून अनुदान मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे वेतनाच्या बाबतीतही उशीर होत आहे. काही प्रमाणात जिल्ह्यातील तांत्रिक अडचणीही कारणीभूत असून त्या त्रुटींची दुुरुस्ती केली जात आहे. परंतु, सध्या तरी शासन जेव्हा वेतन अनुदान देईल, तेव्हाच आम्ही शिक्षकांच्या वेतनाची पुढची प्रक्रिया राबवू.

-विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.