शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:34 IST

Accident Mahavitran Shirala sangli :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देसख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा

विकास शहाशिराळा :  पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील  व मानसिंग बबन पाटील हे दोघे सकाळी ८ वाजणेच्या सुमारास पाडळीच्या लातोंडी नामक परिसरात असणाऱ्या शेती पाण्याच्या मोटारीकडे गेले असता त्यांना या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का लागला. हा धक्का इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की हे दोघे जागीच मृत्यू पावले. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबरोबर काढून तातडीने मोटारसायकलवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.मानसिंग हे शिराळा येथील खाजगी कारखान्यात नोकरीस होते. ते अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे तर विक्रम उर्फ जयकर हे मुंबई येथे खाजगी नोकरीत होते. याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नक्की काय घटना घडली याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले.यानंतर वरिष्ठ कार्यालयातील तज्ञ तसेच अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.विक्रम उर्फ जयकर पाटील हे मुंबईत खाजगी नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे चार- पाच दिवसांपूर्वीच ते पाडळी येथे सहकुटुंब गावाकडे आले होते.घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालय येथे जमले आणि तक्रार करूनही वेळेत वीज मोटार कनेक्शनची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, जो पर्यंत याबाबत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता .

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली