शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या उपमहापौरांसाठी आता अलिशान गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:50 IST

सांगली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या उपमहापौरांसाठी आता अलिशान गाडीस्थायी समिती सभेत प्रस्ताव : दहा लाखाचा खर्च अपेक्षित

सांगली : महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणार आहे. स्थायीच्या दुसऱ्या सभेपासून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उधळपट्टी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांच्याकडील सध्याचे वाहन सतत नादुरूस्त होत असल्याचे कारण पुढे करत त्यांना अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव सभेत आला आहे. त्यासाठी दहा लाखांचा खर्च केला जाणार आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासकामे ठप्प आहेत. ठेकेदारांची देणी थकली आहे. पण त्याचे भाजपला काहीस सोयरसुतक नाही. उलट पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे स्थायीत हा विषय वादळी होण्याची शक्यता आहे. तसेच सांगलीवाडी येथील खोके हस्तांतर, २२ कंत्राटी वाहनचालकांना सहा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्याचा विषयही सभेत आला आहे.याशिवाय अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर बांधण्यासाठी नकाशे व आराखडे तयार करण्याच्या विषयाला मान्यता मिळण्यासाठी स्थायीत प्रस्ताव आला आहे. सावित्रीबाई फुले वाचनालयातर्फे घेण्यात येणारी शारदीय व्याख्यानमालेसाठी पन्नास हजार रुपये खर्चास मान्यता व नियोजन करण्यासाठी दोन सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा विषय सभेत आला आहे. यावर स्थायीत चर्चा होणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली